मुंबई : 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना आणि अरूंधती या एकमेकांच्या सवत म्हणून भूमिका साकारत आहेत. अरूंधती आणि संजना यांच्याचील नातं फार कमी वेळा खेळीमेळीचं असतं. अरूंधती कायम संजनाला मदत करत असते. मात्र संजना अरूंधती विरोधात कायमच घरच्यांना भडकवत असते. असं असलं तरी या दोघींचं खऱ्या आयुष्यातील नातं मात्र वेगळं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अरूंधती म्हणजे मधुराणी गोखलेचा वाढदिवस झाला. ३ मार्च रोजी संजना म्हणजे रुपाली भोसलेने मधुराणीसाठी खास पोस्ट लिहिली. 


ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यामध्ये रूपाली भोसलेने मधुराणीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 



मधुराणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ती म्हणाली, “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा आजचा दिवस आणि येणारे वर्ष तुला खूप खूप छान जावो. तुला खरंच खूप खूप प्रेम आणि घट्ट मिठी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”. (Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीमुळे अभी आणि अनघामध्ये फूट पडणार का?) 


दरम्यान तिने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरत आहे. मालिकेत एकमेकींच्या सवत असणाऱ्या आणि नेहमीच एकमेकींच्या विरोधात उभ्या असणाऱ्या अरुंधती आणि संजना खऱ्या आयुष्यात मात्र फारच चांगल्या मैत्रिणी आहेत.