Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीमुळे अभी आणि अनघामध्ये फूट पडणार का?

अरूंधतीच्या नव्या घरामुळे अभी- अनघाचा संसार मोडणार का? 

Updated: Mar 4, 2022, 12:31 PM IST
Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीमुळे अभी आणि अनघामध्ये फूट पडणार का?  title=

 मुंबई : अरूंधतीचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं आहे. अरूंधतीने आपल्या नव्याने संसार थाटला आहे. अनिरूद्धपासून वेगळी झालेली अरूंधती आई-अप्पांच्या काळजीपोटी समृद्धीमध्ये राहत होती. मात्र ज्या दिवशी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. त्यावेळी अरूंधतीने घर सोडलं. मात्र आता तिच्या जाण्यावरून घरात आक्षेप घेतला जात आहे. 

अरूंधतीने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. तिचं घर लावण्यासाठी सगळेजण येतात. फक्त अभि, कांचन आजी, अनिरूद्ध आणि संजना हे मात्र येत नाहीत. यावरून घरी वाद सुरू होतो. 

अभीचं नवीन लग्न झालं मात्र अनघा हनीमुनला जायला नकार देते. अनघा अरूंधतीच्या बाजूने ठाम उभी राहते आणि अभीला खडेबोल सुनावते. 

नवीन लग्न झालेल्या अभी-अनघामध्ये आता अरूंधतीमुळे काहीच आलबेल नसल्याचं घरातल्या सगळ्यांना लक्षात येतं. याचाच फायदा संजना घेते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संजना अभीचे अनघाविरूद्ध कान भरते. याच रागात अभी रागात अरूंधतीच्या नव्या घरी जातो. मी इथे पहिल्यांदा आणि शेवटचं आलोय. असं देखील सांगतो. यावरून पुन्हा एकदा अरूंधतीवरून अभी आणि अनघा यांच्यात वाद होणार? का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

कारण समृद्धी बंगल्यात कांचन आजी म्हणते की, अरूंधतीवरून आता हे एक नवं जोडपं घरापासून वेगळं होईल, अशी भीती व्यक्त करते. आजीचे हे शब्द खरे तर होणार नाहीत ना?