मुंबई : स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते?'मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. आता अरूंधती आणि अनिरूद्धच्या घटस्फोटाला अवघा एक आठवडा आहे. आपण जाण्याअगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा व्हावा ही तिची मनापासूनची इच्छा. या इच्छेला आजी देखील परवानगी देते. (Aai Kuthe Kai Karte : New character enter in Arundhatis life, She will change the decision?) अरूंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा. या सोहळ्यात एका नव्या पात्राची एन्ट्री होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'समृद्धी' बंगल्यात गौरी-यशच्या साखरपुड्याची जय्यत सुरू आहे. अशावेळी आतापर्यंत कधीच न दाखवलेलं पात्र पहिल्यांदाच सगळ्यांसमोर येणार आहे. आप्पा देशमुख यांचा दुसरा मुलगा आणि अनिरूद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एन्ट्री होत आहे. आतापर्यंत अविनाश देशमुख हे पात्र मालिकेत दाखवण्यात आलं नाही. पहिल्यांदाच अविनाश देशमुख प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेता शंतनु मोघे अविनाश देशमुखचं पात्र साकारत आहे. 



अविनाश देशमुख पहिल्यांदाच सगळ्यांसमोर 



अविनाश आणि अनिरूद्ध पंजा लावताना दिसत आहेत. अनिरूद्ध अविनाशला म्हणतो की,'मी जिंकलो तर काय देशील?' त्यावर अविनाश म्हणतो,'तू मागशील ते.. आणि हरलास तर जे मी मागेन ते देखील?' त्यावर अनिरूद्ध म्हणतो,'ते बघू नंतर...' या दोघांमध्ये पंजा लावण्यात येतो. अविनाश अनिरूद्ध हरवतो... ठरल्याप्रमाणे अनिरूद्ध त्याला म्हणतो,'काय हवं ते माग?' यानंतर अविनाश हात जोडून,'दादा या घरच्या लक्ष्मीला थांबवं.'



अविनाश आणि अनिरूद्ध यांच्या या संवादानंतर सगळेच स्तब्ध होतात. अरूंधती आणि अनिरूद्ध यांचा घटस्फोट व्हावा असं कुणालाच वाटत नसतं. मात्र अरूंधतीने आता आपल्या मनाची तयारी केली आहे. तर दुसरीकडे संजना गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. या सगळ्यात अनिरूद्ध मात्र ठाम निर्णयापर्यंत पोहोचलेला नाही.