लॅपटॉपसोबत 'हे' गॅजेट्स वापरणं गरजेचं; कामं होईल सोपं

आपण सगळेच आता लॅपटॉप वापरतो. लॅपटॉप आपल्या आयुष्याचा जणू एक भाग झाला आहे. कारण विद्यार्थ्यांपासून, प्रोफेशन्ल पर्यंत सगळ्यांना मनोरंजन असो काम असो लॅपटॉपची गरज ही सगळ्यांना भासते. पण तुम्हाला माहितीये का काही गॅजेट्स तुमच्या लॅपटॉपच्या वापरला आणखी चांगलं करू शकता? चला तर जाणून घेऊया काही गरजेचे गॅजेट्स्...

| Nov 26, 2024, 18:02 PM IST
1/7

लॅपटॉप स्टॅंड

एक चांगला लॅपटॉप स्टॅंड तुम्हाला लॅपटॉप सुरक्षित ठेवण्यास मदत करतं आणि त्यामुळे तुमची पाठ देखील दुखत नाही. त्यामुळे तुमचा लॅपटॉप हा ऊंच होतो. 

2/7

वायरलेस कीबोर्ड आणि माऊस तुमच्या वर्कस्पेसवर गर्दी होऊ नये यासाठी मदत होते. यामुळे तुमची काम करणं सोपं जातं. अनेकांना लॅपटॉपच्या टच पॅडवरून काम करायला होत नाही. त्यामुळे वायरलेस माऊस उपयोगी येतो. 

3/7

डेटा सुरक्षित रहावा असं वाटत असेल तर एक एक्सटर्नल हार्ड डिस्क खूप महत्त्वाची ठरेल. त्यात तुमच्या फाईल्स, फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करा.

4/7

हुड तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनला धूळीपासून वाचवेल आणि त्यासोबत त्यावर स्क्रॅच येणार नाही. प्रवास करताना हे कामी येणार. त्याशिवाय बाहेर बसून काम करण्यास देखील मदत होईल. 

5/7

लॅपटॉप जास्त गरम होत असेल तर कूलिंग पॅड गरजेचा आहे. त्यामुळे लॅपटॉप थंड राहिल आणि काम पटपट होईल. 

6/7

डॉर्किंग स्टेशन त्यामुळे लॅपटॉप तुम्हाला डेस्कटॉप सारखा वापरण्यास मदत होते. त्यात तुम्ही एक्स्ट्रा मॉनिटर, की-बोर्ड, माऊस आणि इतर डिव्हाइस कनेक्ट करु शकतात. 

7/7

( Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )