मुंबई : आई कुठे काय करते? मालिकेत आता महत्वाचा टप्पा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संजना आणि अनिरूद्धने जे नातं जगापासून लपवलं होतं त्या नात्याला नाव देण्याची वेळ आली आहे. आज 30 ऑगस्ट रोजी संजना आणि अनिरूद्ध यांचं लग्न होणार आहे. पण या अगोदर असं नेमकं काय झालं की, अनिरूद्धवर जीवापाड प्रेम करणाऱ्या संजनानेच त्याच्यावर हात उचलला आहे. 


संजनाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संजना आणि शेखरचा घटस्फोट झाला. यानंतर संजना अनिरूद्धच्या मागे लग्नासाठी तगादा लावते. अनिरूद्ध या लग्नाला होकारही देत नाही आणि नकारही. पण संजना काही ऐकत नाही. ती या लग्नाची अगदी जोरदार तयारी करते. रजिस्टारला देखील देशमुखांच्या "समुद्धी' बंगल्यात बोलावते. पण अनिरूद्ध लग्नाच्या आदल्याच रात्री घराबाहेर पडतो. कुणालाही न सांगता गेलेल्या अनिरूद्धला यश पाहतो. मात्र त्याकडे तो फार लक्ष देत नाही. दुसऱ्या दिवशी संजना नववधुच्या वेशात तयार होऊन अनिरूद्धची वाट पाहत असते. पण अनिरूद्ध काही तिचा फोन उचलत नाही. 


संजना देशमुखांवर लावते आरोप 



त्यानंतर संजना देशमुखांच्या घरी येऊन गोंधळ घालते. अनिरूद्धला देशमुख कुटुंबियांनीच लपवून ठेवल्याचा आरोप करते. अरूंधतीच अनिरूद्धला पळवून घेऊन गेली असा थेट आरोप देखील संचना करते. संजनाच्या या बोलण्याने सगळेच भडकतात. त्यावेळी गौरी संजनाची मानसिक स्थिती चांगली नसल्याच सांगते. पण या सगळ्या अनिरूद्ध नेमकं कुठे गेला? हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. संजना अरूंधतीला फोन करून आपण अनिरूद्ध आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार करेन असं सांगते. हे ऐकल्यावर अरूंधती शांत बसत नाही. "माझ्या घरच्यांकडे बोट दाखवलंस तर बोट तोडेन मी", अशा शब्दात अरूंधती संजनाला सांगते. 


अरूंधती संजनावर भडकते, पोलिसांत तक्रार करण्याची देते धमकी 



यानंतर अरूंधती डॉक्टरकडे न जाता घरी येते. तेथे संजनाचा तमाशा सुरू असतोच. त्यावेळी संजना पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देते. यावेळी अरूंधती,"जा, पोलिसात तक्रार कर. मग मी ही सांगेन. तू माझा, माझ्या कुटुंबियांचा, मुलांचा मानसिक छळ केला आहेस.' यानंतर संजना शांत होते. पण त्याचवेळी अरूंधतीच्या मोबाइलवर अनिरूद्धचा फोन येतो. मला तुझ्या एकटीशी बोलायचं. आपण घराबाहेर भेटूया का? असं विचारतो. पण त्याचवेळी अरूंधती तुम्ही घरी या. सगळे घरीच आहेत असं सांगते. अनिरूद्ध घरी देखील येतो. पण तो संजनाच्या नजरेला नजर देत नाही. हा सगळा प्रकार संजनासाठी धक्कादायक असतो. अनिरूद्ध दुसऱ्यांदा लग्नाच्या दिवशी निघून जातो. यामुळे रागाच असलेली संजना अनिरूद्धच्या कानाखाली वाजवते. 



यानंतर अरूंधती अनिरूद्धला काय समजावते? अनिरूद्ध संजनासोबत लग्न करण्यास तयार होतो का? दोन वेळा लग्नाच्या दिवशी पळून गेल्यावर संजना अनिरूद्धला ती संधी देते का? या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.