Rupali Bhosale Evil Eye Chain: मराठी मालिकांची लोकप्रियता (Marathi Serials) ही दिवसेंदिवस वाढू  लागली आहे. आज मराठी मालिका या जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे त्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकरांच्याही लोकप्रियतेत (Famous Marathi Serials) वाढ होताना दिसते. सध्या अशीच एक सिरियल मराठी प्रेक्षकांच्या मनामनात घर करून आहे. फार थोड्याच कालावधीत या मालिकेनं लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. हो, तुम्ही बरोबर ओळखलंत. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं तीन वर्षांत अनेक एपिसोड्स पुर्ण केले आहे. या मालिकेतून काम करणारी संजना म्हणजे रूपाली भोसले (Rupali Bhosale as Sanjana) यांचा एक वेगळा फॅन फॉलोइंग तयार झाला आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सध्या तिची एक वेगळ्या कारणासाठी इंटरनेटवर चर्चा रंगली आहे. सगळ्यांचे लक्ष तिच्या त्या इव्हिल आय चेनकडे गेले आहे. (aai kuthe kay karte actor reveals why she wear her favourite necklace everyday entertainment news in marathi)


चेनच्या प्रेमात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजना म्हणजे रूपाली भोसलेच्या स्टाईल स्टेटमेंटचेही (Rupali Bhosale Style Statement) अनेकदा कौतुक होताना दिसते. रूपाली नेहमीच तिच्या गळ्यात एक चेन घालताना आढळते. तिनं कायमच अनेकदा सिरियलमध्ये आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात ही चेन घालताना दिसते. ती ही चेन (Rupali Bhosale Fashion) फारशी कधी काढताना दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष तिच्या या चेनकडे जातेच जाते. पारंपारिक लुकवर तर तिची ही चेन आणखीन खुलून दिसते. परंतु गळ्यात इतर आकर्षक नेकलेस (Nacklace). असले तरीसुद्धा तिच्या गळ्यात ही चेन असतेच असते. नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ग्लॅम लुकमध्ये रूपाली खूपच आकर्षक दिसत होती त्यामुळे तिच्या स्टाईल स्टेटमेंटची एकच चर्चा होती. 


रूपाली भोसलेनं केला खुलासा 


यावेळीही तिनं परिधान केलेल्या ड्रेसवरही चेनही घातली होती. त्यामुळे तिला यावेळी प्रश्न विचारणेही कोणाला राहवले गेले नाही. तिला एका मुलाखतीदरम्यान या चेनबद्दल (Rupali Bhosale Interview) विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ''हो, ही इव्हिल आय चेन आहे. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये जसं संजना मंगळसूत्र घालते. अनिरूद्ध आणि संजनाची कितीही भांडणं होऊ देत परंतु तिचं मंगळसूत्र अजून निघालं नाही.''


''त्याप्रमाणे माझ्या वैयक्तिक आयुष्यात हे माझ्यासाठी एक बंधन आहे. मी कुठलेही आऊटफिट्स घातले तरी ही चेन काढत नाही. त्याचप्रमाणे फोटोशूट करतानाही अनेकदा फोटोग्राफर्स सांगतात की, अंगठ्या काढा, गळ्यातलं काढा परंतु मी हे अजिबातच काढत नाही. मी अनेक गोष्टींबाबत पसेसिव्ह असते. यातही माझ्या भावना आहेत'', असं तिनं यावेळी शेअर केले.



रूपालीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे. त्यामुळे तिची लोकप्रियताही सर्वत्र वाढते आहे.