अरुंधतीने `आई कुठे काय करते` मालिका सोडली? का होतेय अशी चर्चा?
या मालिकेतील अरुंधती हे लोकप्रिय पात्र बनलं आहे.
मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आज प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
या मालिकेतील अरुंधती हे लोकप्रिय पात्र बनलं आहे. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर साकारताना दिसत आहेत. मधुराणी गोखले यांनी आपल्या दमदार अभिनयाने आईची भूमिका घराघरात पोहोचवली आहे. आज त्यांना अरुंधती ही खास ओळख मिळाली आहे.
पण गेल्या काही दिवसांपासून त्या मालिकेत दिसत नाही. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. अरुंधतीने मालिका सोडली आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींना वाटत आहे की अरुंधतीने मालिकेतून आता ब्रेक घेतला आहे.
आता कित्येक दिवसांपासून अरुंधती मालिकेत का दिसत नाही? याचं नेमकं कारण काय ? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
त्याच कारण म्हणजे मधुराणी गोखले यांची तब्बेत ठिक नसल्यामुळे त्यांनी काही दिवस चित्रीकरणातून सुट्टी घेतली होती. त्यामुळे त्या मालिकेच्या भागांमध्ये दिसत नव्हत्या.
मधुराणी यांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. आता त्या ठीक आहेत. एवढंच काय तर त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे असं देखील कळतंय. त्यामुळे लवकरच येणाऱ्या भागांमध्ये त्या दिसून येतील. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतील.