मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिरुद्धपासून वेगळं झाल्यानंतर अरुंधती आता स्वत:चा शोध घेण्यासाठी वेगळी वाट धरत आहे. त्यामुळे मालिकेत नवनवीन टप्पे पाहायला मिळत आहेत. अरुंधती तिची आवड जोपासते आहे. प्रेक्षकांना ही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आता नवीन अवतारात दिसणार आहे. 


अरुंधतीचा गातानाचा व्हिडिओ समोर आल्याने सगळ्यांना असे वाटू लागले की, आता तिने नवीन क्षेत्र निवडलं आहे. आता अरुंधती नव्या अंदाजात दिसणार आहे.


त्याच झालं असं की, अरुंधतीला गाणं गाण्याची आवड आहे. हीच आवड ती एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणतेय. अरुंधतीचं मच वेटेड गाणं आता रिलीज करण्यात आलं आहे.


तिचं 'सुखाचे चांदणे' हे गाणं सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.  या गाण्यातील शब्दांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. हे गाणं ऐकल्यानंतर अनिरुद्ध देशमुखला अश्रू अनावर झाले आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चॅनेलने या गाण्यासंदर्भात पोस्ट केली आहे. 'हरवलेली स्वप्नं होती थबकलेली पाऊले… पण तुझ्या भेटीत आता गवसले… 'सुखाचे चांदणे'…' असं स्टार प्रवाहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.