एका आठवड्यात राझीने केली ५० कोटींची कमाई...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा राझी या सिनेमाचा जलवा बॉक्स ऑफिसवर सुरु आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा राझी या सिनेमाचा जलवा बॉक्स ऑफिसवर सुरु आहे. या सिनेमाने ३ दिवसातच बजेट वसूल केले. धर्मा प्रॉडक्शन आणि जंगली पिक्चर्सच्या राझी सिनेमाने प्रदर्शनाच्या ६ व्या दिवशी पण कमाल केली.सून बनवून भारताची गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात जाणाऱ्या आलिया भट्टला प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळाली. सिनेमाचे वाढते कलेक्शन याचा पुरावा आहे.
इतकी केली कमाई
फिल्म समीक्षक तरण आदर्शनुसार पहिल्या दिवशी राझी सिनेमाने ७.५३ कोटी तर दुसऱ्या दिवशी ११.३० कोटींचा गल्ला केला. रविवारी हा आकडा १४.११ कोटींपर्यंत पोहचला. त्यानंतर वाढत सातत्याने वाढत जाणाऱ्या या आकड्याने ५० कोटींचा पल्ला पार केला. आतापर्यंत सिनेमाने एकूण ५१.२४ कोटींची कमाई केली आहे.
४ स्टार सिनेमा
या सिनेमात आलिया भट्टशिवाय विकी कौशल, रजित कपूर, जयदीप अहलावत, अमृता खानविलकर आणि सोनी राजदान यांची मुख्या भूमिका आहे. या सिनेमाला ४ स्टार मिळाले आहेत.
सत्य घटनेवर आधारित सिनेमा
'राझी' हा सिनेमा सत्यकथेवर आधारित आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाची या सिनेमाला पार्श्वभूमी आहे. आलिया या चित्रपटात एका काश्मिरी मुलीची भूमिका साकार करते. पाकिस्तानामध्ये राहून आलिया भारतासाठी गुप्तहेर म्हणून काम पाहते. या चित्रपटाची कहाणी हरिंदर सिक्का यांची कादंबरी 'कॉलिंग सहमत' यावर आधारित आहे.