` स्वत: अफेअर्स विषयी सांगून त्यानं मुलीच्या...`, नवाजुद्दीन सिद्दीकीवर संतापली आलिया
Aaliya on Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं त्याच्या अफेअर्स विषयी त्याच्या बायोग्राफीत त्याच्या अफेर्सविषयी सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या मुलीवर काय परिणाम होईल याचा विचार त्यानं करायला हवा असं आलिया म्हणाली आहे.
Aaliya on Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आलियामुळे चर्चेत आला आहे. आलियानं पुन्हा एकदा त्याच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी तर आलिया चक्क त्या दोघांची लेक शोराला मध्ये घेऊन आली आहे. तिचं म्हणणं आहे की नवाजुद्दीनं ऑटोबायोग्राफीमध्ये त्याच्या अफेअर्सविषयी जे खुलासे केले आहेत. त्याच्या त्यांच्या मुलीवर परिणाम होऊ शकतो, असं आलिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली.
आलियानं नुकतीच एक न्यूज पोर्टलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आलिया म्हणाली की नवाजुद्दीननं या सगळ्या गोष्टींवर बोलून चांगलं काही केलेलं नाही. त्याचं म्हणणं आहे की अनेक यशस्वी पुरुषांचे महिलांसोबत अफेअर असतात, पण हे तो त्याच्यापर्यंत मर्यादीत ठेवतात. आलिया म्हणाली की त्यांची मुलगी शोरा आता टीनएज मध्ये आहे आणि वडिलांविषयी अशा गोष्टी, तिच्यावर कसा परिणाम करू शकतात. ती पुढे म्हणाली की त्यानं थोडं जबाबदार वडिलासारखं असायला हवं.
आलिया यावेळी सुनीता राजवारविषयी देकील बोलली. सुनीता राजवारविषयी नवाजुद्दीननं त्याच्या बायोग्राफीत सांगितलं होतं. याविषयी बोलताना आलिया म्हणाली की नवाजुद्दीननं तिच्याविषयी असं जगजाहिरपणे सांगितल्यानं तिचे नुकसान होऊ शकते. खरंतर सुनीतानं नंतर यावर स्पष्टीकरण दिले होते की तिनं नवाजुद्दीनसोबत तिचं असलेलं नातं या कारणासाठी तोडले नाही कारण तो करिअरमध्ये स्ट्रगल करत होता. तर त्याच्याशी ब्रेकअप करण्याचं कारणं ही त्याची खालच्या पातळीची विचार सरणी असं सुनीतानं सांगितलं होतं.
हेही वाचा : 'हनुमान देव नाही...', म्हणणारे Adipurush चे लेखक अखेर नमले; मनोज मुंतशिर माफी मागत म्हणाले...
नवाजुद्दीनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर नवाजुद्दीन नुकताच 'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्यानं वयानं खूप लहाण असलेल्या अवनीत कौरसोबत किसिंग सीन दिला होता. त्याच्या या सीनमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. या चित्रपटाची निर्मिती ही कंगना रणौतनं केलं आहे. तर प्रेक्षकांचा या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आलिया विषयी बोलायचे झाले तर ती 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसली होती. पण ती या कार्यक्रमातून खूप लवकर बाहेर पडली. दरम्यान, आलिया सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत आनंदी आहे. त्याच्यासोबत आलियानं तिच्या आयुष्याचा आनंद घेत आहे.