मुंबई : विशिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकीजच्या नसते उद्योग या चॅट शोमध्ये सध्या प्रेक्षक एक चांगला बदल अनुभवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तम कॉमेडी आणि मनोरंजन देणारा झी टॉकीज चा कार्यकम नसते उद्योग आता नव्या रुपात, नव्या ढंगात आणि नवीन वेळेवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी नसते उद्योग च्या मंचावर अवलिया कलाकार करणार नुसते उद्योग आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी सिनेमाला महत्व देऊन, त्याला एक मोठं व्यासपीठ देण्यासाठीच झी टॉकीज ने हे अनोखे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना घराघरात पोहोचवणारी झी टॉकीज ही वाहिनी आता आगामी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी देखील मोलाचा वाटा उचलत आहे.


कोण करणार नसते उद्योग? 


नसते उद्योग या कार्यक्रमाच्या नवीन रुपरेषेत प्रेक्षकांचे लाडके कलाकार क्रांती रेडकर आणि प्रसाद ओक हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे तसेच अंशुमन विचारे, नम्रता आवटे, प्रभाकर मोरे हे हास्यसम्राट प्रमोशनसाठी आलेल्या मराठी चित्रपटावर विनोदी स्पूफ सादर करून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.  


येत्या रविवारी नसते उद्योगच्या रंगमंचावर आम्ही दोघी या सिनेमातील कलाकार येणार आहेत. मराठी सिनेसृष्टीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री मुक्त बर्वे व प्रिया बापट तसेच हँडसम हंक भूषण प्रधान नसते उद्योगच्या सेटवर धमाल करताना प्रेक्षक पाहू शकणार आहेत.    


झी टॉकिज बिझनेस प्रमुख, श्री. बावेश जानवलेकर शो विषयी बोलताना, म्हणाले, “न. स. ते. उद्योग आता नव्या स्वरुपात मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी पुढे सरसावत आहे. प्रेक्षकांना ही संकल्पना आवडली आहे याचा आम्हाला आनंद होत आहे आणि आम्हाला आशा आहे की आमच्या या प्रवासात ते आम्हाला पाठिंबा देतीलच.” ही रपेट अनुभविण्यासाठी पहायला विसरू नका न. स. ते. उद्योग रविवारी २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता फक्त झी टॉकिज वर!