मुंबई : अभिनेता आमिर खानची सोशल मीडियावर एक जाहिरात खूप चर्चेत आहे. जाहिरातीमध्ये आमिर खान नागरिकांना रस्त्यावर फटाके न फोडण्याच आवाहन करत आहे. ही जाहिरात टायर कंपनी Ceat Ltd ची आहे. आता या जाहिरातीवरून सोशल मीडियावर हिंदू विरोधी अशी चर्चा रंगली आहे. भाजप नेता अनंत कुमार हेगडने विरोध दर्शवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेता ceat ltd चे चेअरमन यांना चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्यांनी विरोध करत म्हटले की, देशातील लोकांना नमाजचा देखील त्रास आहे. जी रस्त्यावर पडली जाते. यामुळे तासन् तास रस्ता बंद राहतो. मात्र तुम्ही ही समस्या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवू शकता का? देशात नमाजच्या नावाखाली अनेकदा रस्ते बंद केले आहे. मुस्लिम समाजाचे सण असेच असतात, अस वक्तव्य भाजप नेत्याने केलं आहे. 




नमाज व्यतिरिक्त भाजप नेत्याने चिठ्ठीत अजानचा देखील उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजान दरम्यान अतिशय गोंधळ असतो. यामुळे अनेकांना त्रास होतो. यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवू देखील करू शकत नाही. याच मुद्यांवरून भाजप नेत्याने कंपनीला देखील खडे बोल लगावले आहेत. 


नाव न घेता सलमान खानवर टीका 


आमिर खानच नाव न घेता असेही म्हटले गेले आहे की काही कलाकार सतत हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचे काम करतात. त्याने कधीही आपल्या समाजाच्या चुकीच्या गोष्टी समोर आणत नाहीत.