Aamir Khan Birthday Special : बॉलिवूड कलाकारांची मैत्री किती सुंदर असते हे तर आपल्याला माहित आहे. बऱ्याच वेळा सेलिब्रिटी एकत्र आपल्याला कोणत्या ना कोणत्या पार्टीमध्ये दिसतात. तर कधी कुठे लन्चला गेल्याचे आपण पाहतो. शिवाय पार्ट्यांमध्ये ते एकमेकांच्या गाण्यावर डान्स करताना देखील दिसतात. तर कधी अवॉर्डशोमध्ये डान्स करतात. या सगळ्यात तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? की बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा कधीच अवॉर्डफंक्शनमध्ये दिसत नाही. पण आधी असं नव्हतं, आमिर आधी अवॉर्ड फंक्शनला हजेरी देखील लावायचा आणि तिथे डान्सही करायचा. पण काही कारणांमुळे त्यानं अचानक अवॉर्डशोमध्ये जाणं बंद केलं. आज 14 मार्च रोजी आमिरचा 58 वा वाढदिवस आहे. (Aamir Khan's Birthday) त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्या एक डान्स पर्फॉर्मन्स पाहणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खाननं एकदा अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत (Aishwarya Rai) शोमध्ये डान्स पर्फॉर्मन्स केला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमिर आणि ऐश्वर्या यावेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोलच्या (Kajol) 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' DDLJ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटातील 'तुझे देखा तो जाना सनम' (Tujhe Dekha To Ye Jana Sanam) या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. त्या दोघांनी हा डान्स कोणाच्या घरी वगैरे केला नाही हे दिसत असून कोणत्या कार्यक्रमात केल्याचे दिसत आहे. आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमिर आणि ऐश्वर्या यांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, पहिले बॉलिवूड खूप सुंदर होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आमिर आणि शाहरुखचे कसे आहेत नाते? 


आमिर खान गेल्या बऱ्याच वर्षांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये पोहोचला होता. त्यावेळी करणला आमिरनं त्याचे आणि शाहरुख खानचे नाते कसे आहे त्याचा खुलासा केला होता. आमिर म्हणाला, ते दोघं एकमेकांच्या कामाचा आदर करतात, त्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी या चांगल्या आहेत, पण कधीतरी वाद तर होतातच. त्यावेळी आमिर हे देखील म्हणाला होता की तो शाहरुखच्या आयुष्यात नाही. 


हेही वाचा : RRR चित्रपटातील कलाकारांचं किती शिक्षण झालं माहितीये? 


दरम्यान, आमिरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर दिसली होती. याशिवाय त्या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.