होणाऱ्या सासूबाईंसमोरच आमिरच्या लेकिचा Boyfriend सोबत Romance; पाहा Photos
कधी मानसिक आरोग्यावर (mental health) बोलणारी, कधी वडिलांच्या घटस्फोटावर वक्तव्य करणारी तर कधी प्रियकरासोबतचं नातं जगासमोर आणणारी आयरा तिच्या या स्वभावामुळे कायमच नजरा वळवत असते.
Diwali 2022 : अभिनेता आमिर खान (Aamir khan) आयरा, ही तिच्या खासगी आयुष्यामुळं सातत्यानं चर्चेत असते. कधी मानसिक आरोग्यावर (mental health) बोलणारी, कधी वडिलांच्या घटस्फोटावर वक्तव्य करणारी तर कधी प्रियकरासोबतचं नातं जगासमोर आणणारी आयरा तिच्या या स्वभावामुळे कायमच नजरा वळवत असते. अशा या आयराची (ira khan) यंदाची दिवाळी जरा जास्तच खास आहे. यावर्षीही तिनं Boyfriend Nupur Shikhare याच्यासोबत हा सण साजरा केला. फक्त नुपूरच नव्हे, तर आयराच्या या दिवाळी (Diwali party) सेलिब्रेशनमध्ये तिच्या होणाऱ्या सासूबाई, प्रीतम शिखरे यांचीसुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली.
अधिक वाचा : Diwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली, पाहा Video
काही खास मंडळी, मित्रपरिवारासह आयरानं हे खास क्षण अनुभवले. यावेळी तिनं बेज रंगाच्या साडीला पसंती दिली होती. मिनिमल मेकअप असूनही आयरा अतिशय सुरेख दिसत होती.
एकिकडे आमिरची ही लेक तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधत असतानाच दुसरीकडे नुपूरनंही पिवळ्या रंगाचा कुर्ता घालत फेस्टीव्ह लूक केला होता. त्यच्या आईनंही पिवळ्या रंगाची सुरेख साडी नेसली होती. आयरा आणि नुपूरचं नातं आता सर्वज्ञात झालं आहे. काही दिवसांपूर्वीच नुपूरनं त्याच्या हक्काच्या व्यक्तीला म्हणजेच आयराला जाहीररित्या प्रपोज केलं. बस्स, तेव्हापासूनच या जोडीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.
आयरा आणि नुपूरचं नातं पाहता येत्या काळात ही जोडी नेमकी केव्हा विवाहबंधनात अडकते, याकडेच अनेकांच्या नजरा असणार आहे. लेक आनंदात असल्याचं पाहून आमिरलाही हे क्षण सुखावह वाटत असणार यात वाद नाही.