मुंबई : बोलिवूडच्या मिस्टर पर्फेक्शनीस आमिर खानच्या मुलीचा म्हणजे आइरा खान (Ira Khan) ची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ही चर्चा तर होणारच होती कारण, तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला यूझर्सकडून मोठ्या प्रमाणावर शेअर आणि कमेंट केले जात आहे. आइरा खान (Ira Khan) तशी तिच्या वडीलांप्रमानेच उच्चं विचार सरणीतील मुलगी आहे. तिला स्वच्छंदी जगायला आवडते. लोकं काय म्हणतील? याचा ती कधीच विचार करत नाही. त्यामुळेचे तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हीडिओमध्ये आइरा खान बॉयफ्रेंड नूपुर शिकरे सोबत आनंदाचे क्षण व्यतीत करत आहे. या आधी ही आइरा खान आणि नूपुर शिकरे यांच्या अफेअरची चर्चा होती. आता या व्हीडिओमुळे लोकांना आणखी एक बहाणा मिळाला आहे.



व्हीडिओच्या माध्यमातून आइरा (Ira Khan) तिच्या बॉयफ्रेंडला किती मिस करत आहे हे सांगत आहे. या व्हीडिओमध्ये नूपूर कधी आइरा खान सोबत डेट एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे, तर काही दृश्यात आइरा नूपूरकडे प्रेमाने पाहात आहे. हा व्हीडिओ शेअर करताना आइरा खानने लिहिलेले- 'तुच माझा सहारा आहेस. आता मला मी वेडी असल्याचे भासत आहे. लव यू सो मच कुटी.'


लोकं बऱ्याचदा तिच्या नावाचा उच्चार चुकीचा करतात, त्यामुळे आइरा खानने एक व्हीडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या नावाच्या उच्चाराबद्दलं सांगितले आहे. ती म्हणाली की, तिचे नाव इरा नसून आइरा (Ira Khan) आहे.