मुंबई : बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे अनेक चाहते आहेत. त्याला भेटण्यासाठी अनेकांची मोठी धडपडही सुरु असते. परंतु आमिरच्या एका चाहत्याने आमिरची भेट न झाल्यामुळे त्याच्या मुंबईतील ऑफिसबाहेरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद कासिम असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ३३ वर्षीय मोहम्मद कर्नाटकातील बेळगाव येथील राहणारा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आमिरच्या भेटीसाठी प्रयत्न करत होता. मोहम्मदने आमिरच्या मुंबईतील ऑफिसबाहेर आमिरला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु बाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं आणि आमिरला भेटण्याची परवानगी दिली नाही. 


आमिरला भेटण्याची परवानगी नाकारल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या खिशातून एका द्रव पदार्थाची बाटली काढून त्याचं प्राशन केलं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्याची अशी अवस्था पाहून सुरक्षारक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. सध्या त्याची तब्येत स्थिर आहे.


पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गेल्या अनेक दिवसांपासून आमिरच्या भेटीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतिलं. परंतु अनेक प्रयत्न करुनही तो आमिरला भेटू शकत नव्हता. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचं त्याने सांगतिलं. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असून त्याला कुटुंबियांकडे सोपावण्यात आलं आहे.