आमिर खानच्या `पानी फाउंडेशन`ने पडीक जमीनवर उगवले जंगल
याचा आमिर खानला सार्थ अभिमान आहे
मुंबई : सप्टेंबर 2018 पासून सुरू झालेल्या 2 वर्षांच्या कालावधीत, महान जपानी पारिस्थितिकीविद अकीरा मियावाकी यांच्यापासून प्रेरित- सायट्रीस पर्यावरण ट्रस्टसोबत एकत्र येऊन 'पानी फाउंडेशन'ने आपल्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रवासाची सुरुवात केली, ज्यामध्ये एका पडीक जमिनीचे जंगलात रूपांतर केले. दोन वर्षानंतर, सप्टेंबर 2020 मध्ये या परियोजनेला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
फाउंडेशनने सतारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील गावकऱ्यांच्या मदतीने 2000 झाडे लावली. एक जंगल बनवण्यासाठी झाडांच्या विविध प्रजातींना जाणीव पूर्वक एकत्र लावण्यात आले आणि वृक्षारोपणावर सविस्तर लक्ष ठेवण्यात आले जेणेकरून ते वेगात वाढतील. आणि शेवटचे परिणाम जबरदस्त आहेत आणि अभिमान करण्यायोग्य देखील करण आता निरोगी झाडांसोबत या घनदाट जंगलात, पशुपक्ष्यांसाठी निवास स्थान, फुलपाखरे, कीटक आणि बरेच काही आहे.
आमिरने हा मनाला स्पर्शून जाणारा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, "Really proud of this experiment done by the team.
आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पानी फाउंडेशनची टीम मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि आसपास जल संरक्षण गतिविधिच्या कार्याशी सलग्न आहे. फाउंडेशनच्या अविश्वसनीय कार्याने, वेळ आणि प्रयत्नाने मनुष्य, वृक्ष आणि पशुपक्ष्यांना सामंजस्यपूर्ण रुपात सक्षम बनवले असून त्यांच्या प्रयत्नाने या पडीक, दुष्काळी जमिनीवर आज हरित जंगले उभी राहताना दिसत आहेत.