Aamir Khan's daughter Ira's Kelavn : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपुर शिखरेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला. त्या आधी ते दोघं अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि ते दोघं अनेकदा सोबत दिसायचे. नुपुर, आयरा या दोघांचं कुटुंब खूप जवळच आहे. दरम्यान, आता ते दोघं पुढच्या वर्षी 2024 मध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्यात त्यांच्या लग्नाच्या आधीचे काही कार्यक्रम सुरु झाले आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ आयरानं शेअर केला आहे. त्यापेक्षा जास्त चर्चा ही आयरानं घेतलेल्या उखाण्याची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्री-वेडिंग फंक्शनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. आयराचे हे फोटो तिच्या केळवणच्या फंक्शनमधील आहे. आयरानं शेअर केलेल्या फोटोत तिचं आणि होणारा नवरा नुपुर शिखरेचं केळवणं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. या फोटोला पाहून ते सगळे किती आनंदी आहेत, हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे. मात्र, सगळ्यांचं लक्ष हे आयरानं घेतलेल्या उखाण्यानं वेधलं आहे. आयरा बोलते 'मला मराठी येत नाही, पण पॉपॉयसाठी मी कधी नाही म्हणत नाही.' या कार्यक्रमातील सगळे फोटो शेअर करत आयरानं कॅप्शनमध्ये इमोजी शेअर केले आहेत. 



या कार्यक्रमातील काही फोटो नुपूर शिखरेनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. पहिल्या शेअर केलेल्या फोटोत नुपूरनं कॅप्शन दिलं आहे की आयरा किती गोड आहेस तू. दुसरा फोटो शेअर करत तू ज्या प्रकारे माझ्याकडे पाहतेस. आयरा आणि नुपूर यांच्या केळवणाला लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकर देखील दिसली होती. 


हेही वाचा : ललीत मोदीशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन नव्या नात्यात! EX-Boyfriend सोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल


दरम्यान, केळवणचा कार्यक्रम हा मराठी लोकांचा आहे. लग्नाच्या आधी नातेवाईकांच्या मित्रांच्या घरी होणाऱ्या नवरदेव आणि नवरीला जेवणासाठी बोलावतात. त्यावेळी त्यांना भेटवस्तू देखील देतात आणि आशीर्वाद देतात.