मुंबई :  'दंगल'मध्ये महावीर फोगाटच्या भूमिकेत दिसलेला आमिर खान आता 'सिक्रेट सुपरस्टार'मध्ये एका हटके भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी या चित्रपटातील एका गाण्याचा मेकिंग ऑफ व्हिडिओ शेअर केला आहे. 


'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातील 'सेक्सी बलिए' गाण्याचा हा खास व्हिडिओ फारच मजेशीर आहे. गायक मिका सिंगने या गाण्यासाठी पार्श्वगायन केले आहे. 'दंगल'मध्ये आमिरच्या मुलीची भूमिका साकारणार्‍या सान्या मल्होत्रानेच या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. कोरिओग्राफर म्हणून या गाण्यातून ती पदार्पण करत आहे.   



 


आमिर खानसोबत सिक्रेट सुपरस्टार चित्रपटामध्ये जायरा वसीम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरची भूमिका फार मोठी नाही. पण जायरा सिक्रेट सुपरस्टार आणि तिचं गाण्यातील करिअर कसे पूर्ण करते याचा रंजक प्रवास आहे.