मुंबई : बॉलिवूडचे इतर स्टार्स वर्षभरात ३-४ सिनेमे करतात. पण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान वर्षातून फक्त एकच सिनेमा करणे पसंत करतो आणि इतर सिनेमांना जबरदस्त दणका देतो. अलिकडेच आमिर खान 'महाभारत' सिनेमात काम करणार असल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये आमिरचे नाव फायनल झाल्याची खबर समोर आली होती. पण या सगळ्या अफवाच होत्या. त्यातच आता आमिर खान 'ओशो'शी संबंधित प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचे समोर येत आहे.


आमिरसोबत असणार ही अभिनेत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान यांनी ओशो चे शूटिंग सुरु केले आहे. या बायोपिकचे शूटिंग ओशोंच्या पुण्यातील आश्रमात होणार आहे. या बायोपिकमध्ये फक्त आमिर खान नाही तर आलिया भट्ट देखील झळकणार आहे. या सिनेमासाठी आमिर खानने लूक टेस्टही दिली होती. आमिरचा आगामी सिनेमा ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’च्या प्रदर्शनानंतर या सिनेमाची घोषणा करण्यात येईल.


चाहते उत्सुक


आमिर खानने ओशोंची भूमिका साकारली तर चाहत्यांसाठी हे मोठे सरप्राईज असेल. त्याचबरोबर ओशोंच्या भूमिकेत आमिर कसा दिसतो, हे पाहणे देखील औत्सुख्याचे ठरेल.