मुंबई : अभिनेता आमिर खान सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच, आमिरचा अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर दिसतोय. सोबतच 'दंगल'फेम फातिमा सना शेखही या फोटोत दिसतेय. याच फोटोवरून आमिर ट्रोलच्या निशाण्यावर आलाय. 


कतरिनानं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. फोटोसोबत कतरिना म्हणतेय, 'ठग्स... माझे आवडते आमिर खान आणि फातिमा सना शेख'... या फोटोत आमिरनं कानात आणि नाकात आभूषण घातलेले आहेत... तर मिशीसोबतच केसही वाढलेले दिसत आहेत.


आमिर 'ट्रोल' होण्याचं कारण म्हणजे, ठग्सच्या लुकमधला आमिर या फोटोत कतरिनापेक्षा उंच दिसतोय. 


सोशल मीडियावर, आमिर कतरिनापेक्षा उंच कसा झाला? असं कुणी म्हटलंय... तर कुणी म्हणतंय, कतरिनाहून उंच दिसण्यासाठी आमिरनं हाय हिल्स परिधान केल्यात... 


उल्लेखनीय म्हणजे, ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये आमिर, फातिमा, कतरिना यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.