मुंबई : अभिनेता आमिर खान बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने देखील ओळखला जातो. आमिर सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटासाठी तो अधिक मेहनत घेताना दिसत आहे. यासाठी तो अनेक शारीरिक बदलांमधून जात आहे. मांसाहाचा त्याग करत त्याने शाकाहारी आहाराकडे आपला मोर्चा वळवला आहे. याचदरम्यान त्याला आपल्या आईने बनवलेल्या आहाराची आठवण आली आणि त्यानं आई जीनत हुसैनच्या घरी धाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर सध्या उकडलेल्या पदार्थांचा आहार घेत आहे. भाज्या, फळं, डाळ, पोळया असा संतुलित आहार आमिर घेत आहे. त्याला त्याच्या आईने बनवलेले कबाब फार आवडतात. त्यासाठी तो नेहमी आईच्या घरी जातो. म्हणून तो मध्यरात्री आईच्या घरी कबाब खाण्यासाठी पोहोचला. 


'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या चित्रीकरणसाठी दिल्ली, गुजरात, मुंबई, कोलकाता, बंगलुरू आणि हैद्राबाद सारख्या शहरांची निवड केली आहे. तसेच असे अनेक राज्य आहेत ज्याठिकाणी आमिर खान पहिल्यांदा शूट करणार आहे. या चित्रपटाकरता संपूर्ण देश पालथ घालणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूड स्टार टॉम हॅक्सच्या 'फॉरेस्ट गॅप' या चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. या चित्रपटानं ऑस्कर अवॉर्डही आपल्या नावावर केलं आहे. याच चित्रपटाचा रिमेक बनवण्यासाठी आमिरही तेवढीच मेहनत घेताना दिसत आहे. २०२० मध्ये डिसेंबर महिन्यात 'लाल सिंग चड्ढा' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.