Aaradhya Bachchan Makeup Look Troll : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची लेक आराध्या ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्याला पाहण्यासाठी किंवा तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझी नेहमीच धावपळ करताना दिसतात. आराध्या सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहे. नुकताच आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिची स्तुती केली. मात्र, काही लोकांनी आराध्याला ट्रोल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आराध्याचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत आराध्या ही शाळेच्या गणवेशात दिसत आहे. तर तिच्या हातात गिटार आहे. आराध्याचा हा व्हिडीओ शाळेतील एका कार्यक्रमातील आहे. ज्यात तिनं मेकअप केल्याचे दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या काही मैत्रिणी देखील दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या फॅनपेजवरून शेअर करण्याच आला आहे. अनेकांनी आराध्याच्या या गोंडस लूकची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, तिचा चेहरा दाक्षिणेतील मुलीसारखा आहे. क्यूट आहे ती. काही वर्षांत ती सगळ्यात स्मार्ट होईल. दुसरा नेटकरी म्हणाला, ती तिच्या सुंदरतेनं आणि क्युटनेसनं नक्कीच पुढे जाईल. तिसरा नेटकरी ऐश्वर्याचा उल्लेख करत म्हणाला, आराध्या ही तिची आई ऐश्वर्या सारखी दिसते. मात्र, काही नेटकऱ्यांनी आराध्याला तिच्या लूकवरून ट्रोल केले आहे. एक नेटकरी ट्रोल करत म्हणाला, शाळेत लिपस्टिक कोण लावतं? दुसरा नेटकरी म्हणाला, कोणत्या शाळेत 12 वर्षांच्या मुलीलाा लिपस्टिक लावण्याची परवानगी देतं? तिसरा नेटकरी म्हणाला, ती तिच्या आई प्रमाणेच ओव्हर अॅक्टिंग करणारी मुलगी आहे. आराध्याच्या या व्हिडीओवर अशा कमेंट पाहता आता तिच्या फॅन पेजनं कमेंट सेक्शन बंद करून टाकलं आहे. 


हेही वाचा : 'इश्क हो बेहिसाब सा...', 'जवान'च्या नव्या गाण्यात नयनतारासोबत रोमान्स करताना दिसला किंग खान


आराध्या विषयी बोलायचं झालं तर ती धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत फक्त ती एकटी स्टारकिडनाही तर जवळपास अनेक स्टारकिड्स या शाळेत शिकत आहेत. अनेक स्टारकिड्स या शाळेतील पासआऊट आहेत. या शाळेची अॅडमिशन फी ही 5 हजार रुपये आहे. तर शाळेतील एलकेजी ते 7 वीची 1 लाख 70 हजार इतकी फी आहे. 8 ते 10 साठी या शाळेत आईसीएसईची 1 लाख 85 हजार फी आहे. आईजीसीएसईच्या 8 ते 10 साठी 5 लाख 90 हजार फी आहे. 11 ते 12 आईबीडीपी बोर्डाची 9 लाख 65 हजार फी आहे. तर शाळेतील नक्कीच किती फी आहेत हे तिथे कॉल करून सविस्तर कळू शकतो कारण यात बदल होण्याची शक्यता असते.