मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन सध्या 'दसवी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिषेकने वेळेनुसार स्वतःला प्रचंड बदललं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झालेले बदल अभिषेकने एका मुलाखीतीत सांगितले आहेत. यावेळी अभिषेकने फिल्मी स्ट्रगल आणि आलेल्या अडचणींबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. अभिषेक बच्चन मुलगा, पती आणि वडिलांची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सिनेमा निवडण्याची त्यांची पद्धत पूर्वीच्या तुलनेत कशी बदलली आहे आणि तो खूप विचारपूर्वक सिनेमांची निवड कशी करतो. एक अभिनेता म्हणून तो स्वत:ला नव्याने ओळखाय लागला आहे. 


अभिषेक म्हणाला, 'आता मला असं वाटत आहे, माझी सिनेमा निवडीची परिभाषा बदलली आहे. मला आता फक्त चांगल्या सिनेमांमध्ये काम करायला अवडतं. कोणत्याही सिनेमाची निवड करण्याआधी कथा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वातची आहे..'


अभिनेता पुढे म्हणाला, 'आता माझी मुलगी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक वडिलांसाठी ज्याप्रमाणे त्यांची मुलं असतात. आई - वडिलांच्या वागणुकीवरून मुलं घडतात.  मी नेहमीच माझ्या कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या लोकांपैकी एक आहे'


कोणत्याही सिनेमाची निवड करताना मी सर्वप्रथम माझ्या आराध्याचा विचार करतो. फक्त सिनेमाचं नाही तर, माझ्या जीवनातील अनेक गोष्टी आराध्यावर अवलंबून असतात.


अभिषेक लवकरच 'दासवी' सिनेमामध्ये भ्रष्टाचारी नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे, जो तुरुंगात जातो आणि दहावीचे शिक्षण सुरू करतो. त्याच्यासोबत सिनेमात यामी गौतम आणि निम्रत कौरही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.