टॉपलेस होत वृत्तपत्र वाचताना दिसली अभिनेत्री, फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ
अभिनेत्री त्रिधा चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
मुंबई : बॉबी देओलच्या आश्रम या वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन देणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा स्वतःशी संबंधित पोस्ट शेअर करून चर्चेचा विषय निर्माण करताना दिसते. अशा परिस्थितीत आता तिने आपला टॉपलेस फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली असून, सोशल मीडियावर लोकांनी कमेंट्सचा धुमाकूळ घातला आहे.
त्रिधा चौधरीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती केसात टॉवेल बांधून, चष्मा घालून पेपर वाचताना दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीसमोर नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ ठेवलेले दिसत आहेत. त्रिधाच्या फोटोवर लोकंही जोरदार कमेंट करत आहेत, अनेकजण तिच्या फोटोवर लाईक्स करत आहेत. तिचा फोटो पाहून एका युजर्सने कमेंट करत लिहीलं की, 'कोई अखबार की आग.' तर अजून एका युजर्सने लिहिलं, 'पुढच्या जन्मात एक पेपर बनायचं आहे.' त्याचबरोबर अजून एका युजर्सने लिहिलं की, 'काश माझ्याकडे एक वृत्तपत्र असतं.' त्याचबरोबर लोकं तिच्या फोटोवर तीव्र प्रतिक्रिया करत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
वेब सीरीज 'आश्रम' मध्ये इंटीमेट सीनची चर्चा
त्रिधा चौधरी बॉबी देओलसोबत 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. त्याच्यासोबत तिने वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स देऊन चांगलीच दहशत निर्माण केली होती. सगळीकडे त्याचीच चर्चा होती. वेब सीरिजमधील तिच्या इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली होती की, 'पडद्यावर जे काही दिसतं, ते वास्तवात घडत नाही. हे खऱ्या आयुष्यापेक्षा वेगळं आहे. त्रिधा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिचे 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.