मुंबई : 'एबी आणि सीडी’ चा (AB Aani CD Marathi film) याराना १३ मार्चला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांच्याशी असलेली एकेकाळची मैत्री एका सामान्य माणसाच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवू शकते हे सांगणारा 'AB आणि CD' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकीपण आलेल्या CD म्हणजे चंद्रकांत देशपांडे यांना त्यांचा मित्र AB म्हणजे अमिताभ बच्चन यांचा आधार गवसतो आणि पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया बझ, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स यांनी संयुक्तपणे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय. मिलिंद लेले दिग्दर्शित आणि विक्रम गोखले, (Vikram Gokhale) सुबोध भावेसह सागर तळाशीकर, सायली संजीव, अक्षय टांकसाळे अशी स्टारकास्ट असलेला ‘एबी आणि सीडी’ येत्या १३ मार्चला बॉक्स ऑफिसवर झळकणार आहेत.


गतवर्षी गणरायाचे आगमन झाल्यावर अभिनेते विक्रम गोखले यांच्या ‘एबी आणि सीडी’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या पोस्टरमध्ये विक्रम गोखले यांनी अमिताभज यांच्या लूक केला होता आणि ‘चंदू मी आलो ’ असे वाक्य त्या पोस्टरसह अधोरेखित करण्यात आले होते. या सिनेमात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. अमिताभजींना बऱ्याच वर्षांनी मराठी सिनेमात दिसत आहे. हा कौटुंबिक चित्रपट आहे.


0