हातात सिनेमा नसताना पैसे कुठून येतात ; युजर्सच्या या प्रश्नावर अभिषेकचे जबरदस्त उत्तर
आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे.
मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. स्वतःच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या सेलिब्रेंटीना अनेकदा ट्रोल करण्यात येते. तर युजर्स कधी खोचक प्रश्न विचारुन भांडावून सोडतात. पण युजर्स किंवा चाहत्यांच्या अशा प्रश्नांना नेहमीच सडेतोड उत्तर देऊन चालत नाहीत. तर काही वेळेस समंजसपणेही उत्तरे द्यावी लागतात.
असाच एक खोचक प्रश्न बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला विचारण्यात आला. त्यावर अभिषेकने काय उत्तर दिले पाहुया...
दोन वर्षांपासून हाती एकही सिनेमा नसताना सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तुझ्याकडे पैसा कुठून येतो, असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला. त्यावर अभिषेकने अत्यंत शांत राहात समंजसपणे उत्तर दिले. तो म्हणाला, कारण सर, सिनेमांची निर्मिती आणि अभिनय याशिवाय माझे इतर काही व्यवसाय आहेत. स्पोट्स हे त्यापैकीच एक.
अभिषेकने दिलेल्या या साध्या समाधानकारक उत्तराचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.
अभिषेक बच्चन प्रो कबड्डी लीगच्या जयपूर पिंक पॅंथर्स या संघाचा मालक आहे. तर इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या चेन्नई एफसी संघाचा सहमालक आहे.