मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) कायमच त्याच्या वडिलांसोबत म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत तुलना होते. मात्र आपल्या अभिनयाने आणि हजरजबाबीपणाने अभिषेकने स्वतःचं वेगळेपण जपलं आहे. अभिषेक बच्चनला बॉलिवूडमधील मोस्ट डिसेंट अभिनेता म्हणून ओळखलं जातं. (Abhishek Bachchan gave answer to troller) मात्र सोशल मीडियावर कधी युझर्सला उत्तर द्यायचं असतं तेव्हा मात्र अभिषेक बच्चन मागे हटत नाही. नुकतंच त्याने एका युझरला खूप मजेशीर आणि सडेतोड असं उत्तर दिलं आहे. हा युझर अभिषेकच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसत होता. 


युझरने अभिषेकला विचारला प्रश्न? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चनचा 'फिल्म द बिग बुल'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावर एका व्यक्तीने कमेंट करताना म्हटलं की,'तू काही कामाचा नाहीस. फक्त मी तुझ्याकडे असलेल्या एका गोष्टीमुळे जळतो. तू गोष्ट आहे, तुझी पत्नी. तुला इतकी सुंदर पत्नी कशी मिळाली.' यावर अभिषेकही काही थांबला नाही. त्याने त्या युझरला अतिशय मजेशीर उत्तर दिलं. 


अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर 



अभिषेक त्याला म्हणाला की,'दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. पण मला कळतं नाही, तुम्ही नक्की कुणाबद्दल बोलताय. कारण इलियाना, निक्की यांच तर लग्न झालेलं नाही. मग राहिलो मी, अजय, कुकी आणि सोहम. मला वाटतं डिझ्नीचं देखील मॅरिटल स्टेटस चेक करावं लागेल.'



अभिषेकच्या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत. अभिषेकच्या या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अभिषेक बऱ्याच दिवसांनी आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसत आहे.