Abhishek Bachchan- Salman Khan : अनेक कार्यक्रमांमध्ये आपण सेलिब्रिटींना एकत्र पाहतो. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटींच्या कार्यक्रमात देखील अनेक कलाकार एकत्र दिसतात. तर अनेकदा या पार्टींमध्ये सेलिब्रिटी काही सेलिब्रिटींना इग्नोर करताना दिसतात. या सगळ्यात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ऐश्वर्या रायचा पती अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हे सलमान खानला मिठी मारताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत रिअॅक्शन दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान, अभिषेक आणि अमिताभ यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रोड्यूसर आनंद पंडितच्या बर्थ डे पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्ग्ज कलाकारांनी हजेरी लावली होती. यात शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख हे कलाकार आहेत. या व्हिडीओत सलमान खान स्टेजवर चढतो आणि अमिताभ बच्चन यांना मिठी मारतो. तर त्यानंतर तो लगेच अभिषेक बच्चनला देखील मिठी मारतो. त्याशिवाय ते एकमेकांशी बोलत असल्याचे पाहायला मिळते. या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नेटकरी कमेंट करत म्हणाले, 'ऐश्वर्या आली नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट जो होतोय. आतातर सगळं ठीक होणारचं ना.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'दो दिल म, मगर चुपके चुपके.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्या आज आली असती तर खूप बरं झालं असतं सलमान भाई.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बापरे, सलमान आणि अभिषेकनं पहिल्यांदा एकमेकांना मिठी मारल्याचे मी पहिल्यांदाच पाहतोय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माझ्या एक्सचा एक्स माझा मित्र आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आता अभिषेकला चित्रपट मिळू लागतील.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सगळी ऐश्वर्याची जादू आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ऐश करो भाई.' एकानं ऐश्वर्याचं एक जीफ शेअर केलं आहे. त्यात ती बोलताना दिसते की हे खूप गोड आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'त्यानं मला श्रेय न देता...' Animal च्या दिग्दर्शकावर ट्रांसवुमन स्क्रीनराइटरचे गंभीर आरोप


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे की ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. तर ऐश्वर्यानं बच्चन कुटुंबियांच घर सोडलं असून ती तिच्या आईसोबत राहते. मात्र, या सगळ्या चर्चा असताना देखील ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत आराध्याच्या शाळेत दिसली होती.