Sonali Bendre Love Story Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही तिच्या देखण्या चेहऱ्यापासून तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. सोनाली बेंद्रेनं गोल्डी बहल यांच्याशी लग्न केलं असून त्यांच्या विवाहाला 21 वर्षे झाली आहेत. त्या दोघांची लव्ह स्टोरी ही खूप इंट्रेस्टिंग आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आगे का की त्यांची लव्ह स्टोरी सुरु होण्यामागे अभिनेता अभिषेक बच्चनचा मोलाचा वाटा आहे. या विषयी अभिषेकनं स्वत: खुलासा केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेकनं काही दिवसांपूर्वी 'इंडियाज बेस्ट डांसर 3' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सोनाली ही परिक्षक आहे. तर अभिषेकनं त्यावेळी या शोमध्ये त्याच्या जुन्या दिवसांविषयी बोलताना म्हणाला की 'माझी वहिणी सोनाली ही माझ्या शेजारीच बसली आहे. मी हिच्यासाठा गोल्डीला निवडलं. ते दोघं खूप चांगले मित्र आहेत आणि त्याचं सगळं श्रेय मला घ्यायचे आहे. 'मैं कबाब में हड्डी था!' त्या दोघांमध्ये मी तिसरा होतो. मी त्यांच्यासाठी कामदेव नव्हतो, पण मी गोल्डीशी तेव्हा बोलत होतो जेव्हा तो सोनाली बेंद्रेंच्या अंगारे या चित्रपटाचं शूटिंग करत होता.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिषेकमुळे जमली सोनाली आणि गोल्डी यांची जोडी


अभिषेक पुढे म्हणाला की 'मला असं वाटतं की गोल्डी आणि सोनाली तेव्हाच पहिल्यांदा भेटले होते आणि मला आठवण आहे की त्यावेळी गोल्डी माझ्याशी बोलायचे आणि म्हणायचे की सोनाली खूप चांगली आहे.' यावर सोनालीनं होकार दिला आणि म्हणाली की 'खरंच तिच्या आणि गोल्डीच्या लव्ह स्टोरीमध्ये अभिषेकचे महत्त्वाचे स्थान आहे.' सोनालीनं म्हटलं की 'मेजर साहेब दरम्यान, अभिषेक एका प्रेमळ व्यक्ती प्रमाणे होता जो आमची काळजी घ्यायचा, आम्ही देखील असंच करायचो.' सोनाली आणि गोल्डी हे पहिल्यांदा नाराजच्या सेटवर भेटले होते. त्या दरम्यान, दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्या दोघांनी 12 नोव्हेंबर 2002 मध्ये लग्न केलं. 


सोनालीच्या प्रेमात वेडा असलेला हा पाकिस्तानी क्रिकेटर करणार होता तिला किडनॅप?


सोनालीच्या प्रेमात एक पाकिस्तानी क्रिकेटपटू देखील होता. त्यानं तर चक्क तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी क्रिकेट टीमचा एक वेगवान गोलंदाज सोनाली प्रेमात आकंठ बुडाला होता. नुकताच एका मुलाखतीत याचा खुलासा झाला आहे. 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. इतकंच नाही तर, तो तिचा फोटो देखील आपल्या पाकिटात ठेवून फिरत होता.


हेही वाचा : धनुष आणि ऐश्वर्या येणार एकत्र? विभक्त झाल्यानंतर दीड वर्षातच पुन्हा करणार पॅचअप


दरम्यान, एका मुलाखतीत गंमतीत शोएब अख्तरने याबद्दल खुलासा केला. त्याचं सोनालीवर इतकं प्रेम होतं की, 'मी त्यावेळी सोनाली बेंद्रेला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता आणि जर ती मला नाही म्हणाली असती तर, तिला किडनॅप करण्याचा विचार देखील केला होता.'