मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक लवकरच 'ब्रेथ इनटू द शॅडोज' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. त्याच्या या वेबसीरिजचा नवा सीझन 9 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या वेबसीरिजच्या प्रमोशनच्या निमित्तानं एका मुलाखतीत त्याची आई जया बच्चनविषयी (Jaya Bachchan) मोठा खुलासा केला आहे. खरंतर अभिषेक नेहमीच पापारांझींवर संतापणाऱ्या जया बच्चन यांना अग्रेशन आणि हिंसाचार आवडत नाही असं वक्तव्य अभिषेकनं केलं आहे. त्यामुळे अभिषेकनं केलेला हा वक्तव्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. अभिषेकच्या या वक्तव्यावर मात्र, नेटकऱ्यांचा विश्वास नाही. या आधी नेटकऱ्यांनी जया बच्चन यांना पापाराझींसोबत अग्रेसिव्ह झाल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमात पोहोचलेल्या अभिषेकनं सांगितले की त्याची आई जया बच्चन 'ब्रेथ इनटू द शॅडोज'चा सीझन 2 पाहणार नाही. याविषयी पुढे अभिषेक म्हणाला, 'आम्ही एक चांगला थ्रिलर बनवला आहे. त्याचं सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे माझी आई तो बघणार नाही. ती बोलते की तिला भीती वाटते. 


अभिषेक पुढे म्हणाला, 'ब्रेथ इनटू द शॅडोज - सीझन 2' संदर्भात त्याच्या घरात उत्साहाचे वातावरण आहे आणि त्याच्या आईशिवाय सर्वजण ही सीरिज पाहणार आहेत. याविषयी अभिषेक पुढे जया बच्चन यांच्याबद्दल एक मजेदार गोष्ट देखील सांगितली आहे. 'माझी आईसोडून माझं संपूर्ण कुटुंबीय शो पाहण्यासाठी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सीरिज पाहण्याची प्रतिक्षा करतील. तिला अशा प्रकारची अग्रेशन आणि हिंसा आवडत नाही. म्हणूनच ती संसदेत जाते, जिथे असे काही होत नाही!' (abhishek bachchan reveals mother jaya hates watching violence aggression prefers parliament over it) 


अभिषेकनं सांगितलं की त्याची भाची नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) डार्क थ्रिलरच्या कहानी जास्त पाहते. 'ब्रेथ इनटू द शॅडोज'मधील त्याच्या अभिनयाबद्दल वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रतिक्रिया सांगत अभिषेक म्हणाला, 'ते पक्षपाती आहेत'. अभिषेक म्हणाला की, बिग बींना त्याचे काम नेहमीच आवडते आणि त्याच्या अभिनयाची प्रशंसा करतात.'


या वेब सीरिजचे दिग्दर्शन मयंक शर्मानं केलं आहे. सीझन 1 च्या कलाकारांमधील अभिषेक सोबत यावेळी नित्या मेनन, सैयामी खेर आणि अमित साध देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. नवीन कस्तुरिया यावेळी एका डार्क भूमिकेत दिसणार आहे, ज्यामुळे कहानी अधिक मजेदार असणार आहे.