Abhishek Bachchan Aishwarya Rai Family : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitach Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन यानंही अभिनय क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली. वडिलांइतकी प्रसिद्धी मिळवण्यात अपयश मिळालं असलं तरीही अभिषेकनं त्याचा वेगळा चाहतावर्ग मात्र निर्माण केला. 2007 मध्ये या अभिनेत्यानं अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याशी लग्नगाठ बांधत सहजीवनाचा प्रवास सुरु केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या चार वर्षांनंतर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या या नात्यात एका गोड परिचं आगमन झालं. अर्थात त्या दोघांच्या नात्यात एका चिमुकलीचा जन्म झाला. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या, या दोघांनीही त्यांच्या लेकिलाच प्राधान्यस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळतं. पण, तिच्या जन्माआधी त्यानं केलेलं एक वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आलं आहे. लग्नाला जसजसे दिवस उलटत होते तसतसं ऐश्वर्या आणि अभिषेकवर बाळाचा विचार कधी करताय? अशा आशयाच्या प्रश्नांचा मारा केला जात होता. सातत्यानं केल्या जाणाऱ्या या प्रश्नांवर खुद्द अभिषेकनंच एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. (Abhishek Bachchan slammed people for gossiping about Aishwarya Rai and his baby plannings)


काय म्हणालेला अभिषेक? 


2010 मध्ये  GQ magazine ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या होत्या. दोन मुलं असणं आपल्यालाही आवडेल, कारण आपल्यालाही एक लहान बहीण होती, असं तो म्हणाला होता. मुलांच्या बाबतीत हे planning वगैरे आणि तत्सम संकल्पनांच्या आपण विरोधात असल्याचं तो म्हणाला होता. 


सारखं काय बाळाचे प्रश्न? 


मुलाखतीत पुढं त्यानं, आपल्याला सातत्यानं जेव्हा ऐश्वर्या आणि तू बाळाचा विचार केव्हा करणार असे प्रश्न विचारले गेले तेव्हा विचित्र वाटतं असंही त्यानं सांगितलं होतं. 'मला ते फारच विचित्र वाटतं. मला त्या अनुशंगानं तो विचारच माझ्या डोक्यात आणायचा नाहीये. यात तुमचं काहीही घेणंदेणं नाही. इतर कुणाला मुलं होतायच हे लोकांना ठाऊक असावं असं मला वाटतच नाही. मला मुलं कधी होणार हे तुम्हाला का ठाऊक असावं?', असा सवालच त्यानं केला होता. 


हेसुद्धा वाचा : King Charles III यांच्या राज्याभिषेकाच्या व्हिडीओमध्ये अनेकांना दिसला मृत्यू; Viral Video मध्ये काळ पाहून हादराल 


 


बऱ्याचदा माध्यमांची उपलब्धता आणि इतर काही कारणांनी सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी होते. पण, ही दरी कमी झाल्यानंतरही काही मर्यादा असतात ज्यांचं उल्लंघन होऊन चालत नाही ही बाब मात्र अनेकांनाच लक्षात राहत नाही. इथूनच पुढे या नात्याला तडा जातो आणि मग कितीही बोचऱ्या वाटल्या तरीही काही गोष्टी जरा स्पष्टपणेच मांडाव्या लागतात. योग्यवेळी अभिषेकनंसुद्धा हेच केलं होतं.