Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला अनेकदा त्यांचा अभिनय कौशल्यामुळे अनेकदा ट्रॉल होतो. बऱ्याचवेळा अभिषेकची तुलना ही त्यांचा वडिलांशी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्याशी करण्यात येते. सोशल मीडियावर अनेक नेटकरी त्याच्या अभिनयावर कमेंट आणि मिम तयार करत विनोद करताना दिसतात. मात्र, एका चाहत्यानं अभिषेक बच्चनला चक्क कानशिलात लगावली हे तुम्हाला माहिती आहे का? 'धूम 3' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वत: अभिषेकने या घटनेचा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यानं लगावली होती अभिषेक बच्चनच्या कानशिलात. याविषयी सांगत अभिनेता म्हणाला, "एक महिला माझ्याकडे आली आणि 'शरारत' चित्रपटात माझा अभिनय किती वाईट होता, हे मला सांगितले. मग तिने मला कानशिलात लगावली आणि मला अभिनय सोडायला सांगितलं. मी इतका खराब अभिनय करत आहे की मी माझ्या वडिलांचे नाव खराब होत आहे. असे तिचे म्हणणे होते." दरम्यान, अभिषेकसोबत कतरिना कैफ, आमिर खान आणि उदय चोप्रा होते. तर ज्यावेळी अभिषेकनं हा किस्सा सांगितला तेव्हा त्याच्यासोबत ते तिनही कलाकार उपस्थित होते. 



अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की बोल बच्चन प्रदर्शित झाल्यानंतर मी त्याच थिएटरमध्ये गेलो होतो आणि तिथे 10 हजार प्रेक्षक होते. मी माझ्या गाडीतून उतरलो फोटो क्लिक केला आणि माझ्या वडिलांना पाठवला. ही खूप आश्चर्यात पाडणारी गोष्ट होती की कशा प्रकारे तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलतं. आता अनेक लोक अभिषेकची बाजू घेताना दिसतात. 


अभिषेक बच्चननं 2000 मध्ये 'रिफ्युजी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'मैं प्रेम की दिवानी हूं' या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 'बंटी और बबली', 'गुरु', 'सरकार', 'युवा' आणि 'ब्लफमास्टर' यांसारख्या चित्रपटांतून अभिषेकने त्याच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. 


हेही वाचा : "25 वर्षे काम मिळालं नाही म्हणून...", Ameesha Patel वर संतापली Urfi Javed


अभिषेकच्या चांगल्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर दिलीप कुमार यांच्यानंतर सलग तीन वेळा अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारा अभिषेक बच्चन हा दुसरा अभिनेता आहे. सध्या अभिषेक बच्चन 'घुमर' या त्याच्या नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. ज्याचं शूटिंग पूर्ण झालं आहे. तर त्याशिवाय अभिषेक 'SSS7' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ओटीटीवर त्याचा 'Breathe: Into The Shadows Season 2', 'दसवीं' आणि 'बॉब बिस्वास' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता