ऎश्वर्या-अनिलच्या ‘फन्ने खां’चं शूटिंग सुरू होताच झाला अॅक्सिडेंट
मुंबई ५ नोव्हेंबरला ‘फन्ने खां’ या ऎश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या बहुचर्चीत सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. शूटिंग सुरू झालं त्याच दिवशी या सिनेमाच्या सेटवर अपघात झाल्याने गोंधळ उडाला.
मुंबई : मुंबई ५ नोव्हेंबरला ‘फन्ने खां’ या ऎश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या बहुचर्चीत सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. शूटिंग सुरू झालं त्याच दिवशी या सिनेमाच्या सेटवर अपघात झाल्याने गोंधळ उडाला.
असे सांगितले जात आहे की, ‘फन्ने खां’ची शूटिंग रस्त्याच्या मधोमध होत होती आणि एक बाईक क्रू मेंबरला जाऊन भिडली. ही क्रू मेंबर दुसरी कुणी नसून तिसरी असिस्टंट डिरेक्टर होती. ती त्यावेळी रोड क्रॉस करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बाईकने धडक देताच ती खाली पडली आणि तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघात झाला त्यावेळी ती हेडफोन घालून चालत होती. त्यामुळे तिला बाईकचा हॉर्नच ऎकू आला नाही. ज्या सीनचं शूट होत होतं त्यात ऎश्वर्या एका टॅक्सी चालकाला थांबवते असे दाखवण्यात आले होते. पण अचानक झालेल्या अपघाताला पाहून ती घटनास्थळाकडे धावत जात होती. पण गार्डने तिला तिकडे जाण्यापासून रोखले.
‘फन्ने खां’ हा एक म्युझिकल कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकर हे करत आहे. या सिनेमात अनिल कपूरसोबतच राजकुमार याचीही भूमिका आहे. हा सिनेमा पुढील वर्षी १३ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमाची निर्मिती राकेश ओमप्रकाश मेहरा आणि प्रेरणा अरोरा करत आहेत. मेहरा यांनी २००० मध्ये ऑक्सरसाठी नामांकन मिळालेला ‘एव्हरीबडी फेमस’ पाहिला होता. या सिनेमाची कथा त्यांना फार आवडली होती. ही कथा अडॉप्ट करून यावर एक चांगला बॉलिवूड सिनेमा केला जाऊ शकतो असे त्यांना वाटले.