मुंबई : बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वारे चांगलेच सोसाट्याने वाहत आहेत. अशातच आता आणखी एका लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं. आलिया भट्टनंही या विवाहसोहळ्यामध्ये सुंदर परफॉर्मन्स देत उपस्थितांच्या नजरा स्वत:कडे वेधल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा विवाहसोहळा होता, अभिनेता आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांचा. 


एका दिमाखदार विवाहसोहळ्यात ही सेलिब्रिटी जोडी लग्नबंधनात अडकली. यावेळी मोजक्या पाहुण्यांची हजेरी पाहायला मिळाली.


सोशल मीडियावर सध्या या विवाहसोहळ्यातील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कुठे अनुष्का लग्नासाठी तयार होताना दिसत आहे.


ही नवी जोडी वरमालेच्या वेळी एकमेकांना डोळे भरुन पाहतानाचे क्षणही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. 


पारंपरिक लाल रंगाच्या लेहंग्यापेक्षा अनुष्कानं लग्नासाठी फिकट जांभळ्या रंगाच्या लेहंग्याला पसंती दिली होती. यामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. 


अनुष्का आणि आदित्यच्या विवाहसोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 



लग्नासोबतच त्यापूर्वी पार पडलेल्या अनेक कार्यक्रमांच्या वेळीसुद्धा बऱ्याच प्रसिद्ध चेहऱ्यांची हजेरी पाहायला मिळाली. 




अनुष्का आणि आदित्यच्या या विवाहसोहळ्याला हजेरी लावणाऱ्यांमध्ये आलिया भट्ट, वाणी कपूर, अथिया शेट्टी, अॅली गोनी, क्रिस्टल डिसूजा, यांच्या नावांचा समावेश होता.