मुंबई :  बॉलिवूड अभिनेता आदित्य सील आणि अनुष्का रंजन विवाहबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओचा बोलबाला आहे. दरम्यान, एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये आदित्य सील लग्नाच्या वेळी अनुष्काचे अश्रू पुसताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून कमेंट करून ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काचे अश्रू तरळले


वरमाला घालण्याआधी भटजीचं म्हणणे ऐकून अनुष्का रडू लागते असं व्हिडिओत दिसून येत आहे. मग आदित्य तिचे अश्रू पुसायला लागतो.


यानंतर अनुष्काच्या चेहऱ्यावर हसू येते. लग्नात अनुष्काने लैव्हेंडर कलरचा लेहेंगा आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्याचवेळी आदित्य फिकट पिवळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.


आलियाच्या डान्सची चर्चा


आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांच्या संगीत सोहळ्याला आलिया भट्टने हजेरी लावली होती. ती मैत्रिणींसोबत जबरदस्त डान्स करताना दिसली. अनुष्का रंजनची बहीण आकांक्षा ही आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड आहे.


आलियाने तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढून या लग्नाला हजेरी लावली होती.


अनुष्का आणि आदित्यच्या लग्नाला आलिया भट्ट, सुझैन खान, क्रिस्टल डिसूझा, भूमी पेडणेकर, अथिया शेट्टी, वाणी कपूर यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. या अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.




या चित्रपटांमध्ये काम केले
 आदित्य सील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'एक छोटी सी लव्ह स्टोरी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'तुम बिन 2' मध्ये त्याने काम केले आहे. 'स्टुडंट्स ऑफ द इयर 2' या चित्रपटातून आदित्यला प्रचंड लोकप्रियता मिळाली.


या चित्रपटात त्याने टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडेसोबत काम केले होते. आदित्य शेवटचा 'इंदू की जवानी' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने कियारा अडवाणीसोबत स्क्रीन शेअर केली होती.