`10 महिन्याचं बाळ असलेल्या एका महिलेची बॅग घेतली आणि...`, अभिनेता Ajith Kumar चं कौतुक
Actor Ajith Kumar : अजित कुमारचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत नेटकरी अजितचं कौतुक केलं आहे.
Actor Ajith Kumar : दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार (Ajith Kumar) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अजित कुमारचा नुकताच थ्रिलर ‘थुनिवू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी अजितच्या वडिलांचे निधन झाले होते. या दु:खातून अजित कसा तरी बाहेर पडला. तर दुसरीकडे तो त्याचा आगामी चित्रपट AK62’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं. त्या सगळ्यात 51 वर्षाच्या अभिनेत्यानं असं कृत्य केलं आहे की त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. खरंतर अजितचा लंडनमधील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एका महिलेनं तिच्या बाळाला कढेवर घेतलं आहे. तर तिची बॅग अजितनं घेतल्याचे दिसत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
ही महिला तिच्या 10 महिन्याच्या मुलासोबत प्रवास करत होती. बाळासोबत इतका लांबचा प्रवास करणं सोपी गोष्ट नाही. एकीकडे सामान तर दुसरीकडे बाळ हे सांभाळण खूप कठीण आहे. तर अजित तिच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्यानिमित्तानं त्या महिलेच्या पतीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित यांचे आभार मानले आहे.
त्या व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, माझी पत्नी आज ग्लासगो ते चेन्नई प्रवास करत आहे. ती आमच्या 10 महिन्यांच्या बाळासह एकटीच प्रवास करत आहे. तिला आज लंडन हिथ्रो येथे सुपरस्टार अजितकुमारला भेटण्याची संधी मिळाली. माझी पत्नी केबिन सुटकेस घेऊन प्रवास करत होती, इतकंच नाही तर तिच्याकडे एक बेबी बॅगसुद्धा होती. तर या सुपरस्टारने माझ्या बायकोच्या हातातील बेबी बॅग हातात घेत तिला फ्लाइटपर्यंत जाण्यास मदत केली. माझी पत्नी एकटी आहे हे कळताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. माझ्या पत्नीने जेव्हा यासाठी नकार दिला तेव्हा ते तिला नम्रपणे म्हणाले, 'ठीक आहे. त्यात काही नाही मलाही दोन मुले आहेत. त्यामुळे मी समजू शकतो.'
हेही वाचा : 'मी तुझा न्यूड फोटो माझ्या घरात...', अभिनेत्री Vanita Kharat च्या मित्राचं मोठं वक्तव्य
पुढे ती व्यक्ती म्हणाली, अजितनं माझ्या पत्नीला फक्त विमानापर्यंत पोहोचवलं नाही तर तिची बॅग तिच्या सीटवर पोहचली की नाही याची खात्रीही करून घेतली. सोशल मीडियावर आता अजितनं केलेल्या त्याच्या या कृत्याची खूप चर्चा सुरु आहे. अजित हा एक तमिळ सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अजित अशा चांगल्या कारणांमुळे चर्चेत राहण्याची ही पहिली वेळ नाही या आधी देखील तो अशाच काही कारणांमुळे चर्चेत होता. दरम्यान, अजितच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं ‘विश्वासम’, ‘वेदालम’ आणि ‘वीरम’ यासारखे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपट देणाऱ्या अजितचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याने १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘एन वीजु एन कानावर’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले