Akshay Kumar Dance Video : अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट आज चित्रपटगृहात दाखल झाला आहे. पण अजूनही अक्षय कुमार मात्र काही केल्या आपल्या या चित्रपटाचे प्रमोशन थांबवता दिसत नाहीत नाहीये. आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षयचा एक डान्स व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे सध्या त्याच चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अपंग व्यक्तीसोबत अक्षय कुमार डान्स करताना दिसतो आहे. दोघांनी केलेला हा धमाकेदार डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 


वास्तविक, हा व्हिडिओ दिल्लीचा आहे जिथे अक्षय कुमार 'रक्षा बंधन' रिलीज होण्यापूर्वी त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. दरम्यान, तिथे त्याला 


अक्षय आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने दिल्लीतदाखल झाला होता. तिखे त्याला एक व्यक्ती भेटली ज्यांचे नाव विनोद ठाकूर भेटले. ते अपंग असून त्यांना दोन्ही पाय नाहीत पण आपल्या नृत्याने त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली आहेत. विनोद कुमार हे आपल्या डान्ससाठी ओळखले जातात आणि त्यांचे असे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.


दिल्ली येथे प्रमोशनसाठी पोहचलेल्या अक्षय कुमार विनोद कुमार यांच्यासह नाचला आणि त्या दोघांनाही अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटातील 'है सौदा खरा-खरा' या गाण्यावर स्टेजवर नाच केला. दोन्ही पाय नसलेल्या विनोद कुमार यांच्यासह नाचण्यासाठी अक्षय कुमारही गुडघ्यांवर बसून नाचला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

)


अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अक्षय कुमारने हा व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी त्याला प्रचंड पसंती दिली. अक्षयने यावेळी विनोद ठाकूर यांच्या नृत्यशैलीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अक्षयने आपुलकीने त्याच्यासोबत केलेला डान्स पाहून चाहत्यांनी अक्षयचे कौतुकही केले आहे.