नवी दिल्ली : सिंगापूरचा लोकप्रिय अभिनेता एलॉयसियस पांग याचा न्यूझीलंडमध्ये अपघाती मृत्यू झालाय. सैन्य प्रशिक्षणादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर रुग्णालयात एलॉयसियसनं अखेरचा श्वास घेतला. संरक्षण मंत्रालयानं बुधवारी रात्री एका अधिकृत वृत्तात याबद्दल माहिती दिली. २८ वर्षीय एलॉयसियस पांग याच्यावर हॅमिल्टनमधल्या वायकाटो रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या पोटावर अनेकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, त्याचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही दुर्घटना शनिवारी वायओउरू प्रशिक्षण भागात घडली. सिंगापूर सशस्त्र दलाचे दोन जवान एका तोफेची देखभाल-दुरुस्ती करत असताना हा अपघात घडला... आणि नजरचुकीनं एलॉयसियस पांगच्या पोटावर तोफेची नळी लागली. 


अपघातावेळी एलॉयसियस पांग देशात अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय सेवा अंतर्गत सशस्र दलाच्या सेवेसाठी तयार राहण्याच्या नागरिकांच्या प्रतिबद्धते अंतर्गत प्रशिक्षण घेत होता. पांगच्या जखमी भागावर अनेकदा शस्रक्रिया करण्यात आली... शिवाय त्याला जीवन रक्षण प्रणालीवरही ठेवण्यात आलं होतं. परंतु, त्याला वाचवण्यात यश येऊ शकलं नाही. 


१९९९ साली टेलिव्हिजन सीरियल्समध्ये बाल कलाकार म्हणून एलॉयसियस पांगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. २०१६ मध्ये स्टार अवॉर्डसमधल्या सर्वात लोकप्रिय दहा पुरुष कलाकारांच्या यादीमध्येही त्याचं नाव होतं.