Shocking Big News : `बंदिश बँडिट्स` फेम अभिनेता अमित मिस्त्रीचं निधन
सैफ - प्रितीसोबत `क्या कहना` सिनेमात केलंय काम
मुंबई : बंदिश बँडिट्स या लोकप्रिय वेब सीरिज फेम अभिनेता अमित मिस्त्री (Amit Mistry) चं निधन झालं आहे. (Actor Amit Mistry dies of heart attack) मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने अमित यांचं निधन झालं आहे. अमित हे लोकप्रिय गुजराती अभिनेता असून त्यांनी हिंदीत देखील काम केलं आहे. त्यांची 'बंदिश बँडिट्स' ही वेब सीरिज खूप लोकप्रिय झाली. यासोबतच 'वह क्या कहना', 'एक चालीस की लास्ट लोकल', '99 शोर इन द सिटी', 'यमला पगला दीवाना' सारख्या सिनेमांतही त्यांनी काम केलं आहे.
कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर झाले अभिनेता
अमित मिस्त्री यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधी लॉ चं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते अभिनय क्षेत्रात वळले. शिक्षण पूर्ण करून अभिनयाच्या स्पर्धेत भाग घेतला. एवढंच नव्हे तर ते नवरात्रीत गाणं देखील गात होते. स्पर्धेत सिनेसृष्टीतील जेष्ठ मंडळी परीक्षक म्हणून येत तेव्हा त्यांच्या ओळखी झाल्या. त्यानंतर ते पृथ्वी थिएटरमध्ये काम करू लागले. मकरंद देशपांडेंसोबत अमित मिस्त्री यांनी खूप काम केलं आहे.
टीव्हीपासून केली होती सुरूवात
अमित मिस्त्री यांना अनेक नाटकांत काम केल्यानंतर मालिकांमध्ये रोल मिळाले. त्यांच्या पहिल्या मालिकेत आशुतोष गोवारिकर आणि लिलिपुट देखील होते. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर अमित यांचं पूर्ण आयुष्यच बदलून केलं. ते 'शुभ मंगल सावधान', 'भगवान बचाए' सारख्या सीरियलमध्ये दिसले. टीव्ही नंतर ते सिनेमांकडे वळले. सैफ आणि प्रीति झिंटाच्या 'क्या कहना' सिनेमात काम केलं आहे. यानंतर त्यांचे अनेक सिनेमे आले.
बंदिश बँडिट्समध्ये दिसले अखरचे
अमित मिस्त्री यांनी एमेझॉन प्राइमच्या 'बंदिश बँडिट्स' या सीरिजमध्ये काम केलं आहे. यामध्ये नसीरूद्दीन शाह यांच्या लहान मुलाची म्हणजे देवेंद्र राठोर यांची भूमिका साकारली आहे. संगीतावर आधारित असलेल्या या वेब सीरीजमधील अमित यांचं काम खूप पसंतीला आला.