मुंबईः मराठी सेलिब्रेटीही सध्या सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. अगदी त्यांचे रिल्स असोत, फोटोशूट असो वा आगामी चित्रपटाचे प्रमोशन या सगळ्यांचे अपडेट्स मराठी कलाकारही आपल्या चाहत्यांसह शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फोलोवर्सही आहेत. पण अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या अकांऊटसोबत गैरप्रकारही केले जातात. असाच एक प्रकार नुकताच एका दिग्गज अभिनेत्यासह घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचे एक खोटे इन्टाग्राम अकांऊट बनवण्यात आलं आहे आणि या अकांऊटवर एक अज्ञात व्यक्ती लोकांकडे खोटी पैशांची मागणी करत आहे. या सर्व गैरप्रकाराचा स्क्रीनशॉट काढून अभिनेते अमोल कोल्हे यांनी इन्टाग्रामवरील आपल्या ऑफिशियल अकांऊटवर चाहत्यांना या खोटेपणापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 


हा प्रकार अमोल कोल्हे यांनी कालच उघडकीस आणला आहे. त्याचे स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी प्रेक्षकांना त्यांच्या नावाने खोटे अकाऊंट कोणीतरी ओपन केल्याचे उघड केले आहे. ज्या अकांऊटवर अमोल कोल्हे यांचे फोटो असून त्याच अकांऊटवरून ती व्यक्ती लोकांकडून पैशांची गरज असल्याचं खोटं सांगून गुगल पे वरून पैसे ट्रान्सफर करू शकता का एका मित्राला पैशांची गरज असल्याचं विचारतं आहे. 



या सगळ्याप्रकाराची पोलखोल करत अमोल कोल्हे यांनी लोकांना सावधगिरीचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, '' @kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या.''