मुंबई : अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलेले अभिनेते दलीप ताहिर यांना सोमवारी पोलिसांनी अटक केलं आहे. दलीप यांच्यावर असा आरोप आहे की, दारूच्या नशेत गाडी चालवून त्यांना एका ऑटो रिक्षाला जोरदार टक्कर मारली आहे. ज्यामुळे दोन लोकं जखमी झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, या अपघाताच्या वेळी दलीप दारूच्या नशेत होते. दलीप यांनी ज्या ऑटो रिक्षाला धडक दिली त्यामध्ये दोन प्रवासी बसले होते. या दोघांच नाव जेनिता गांधी आणि गौरव चुघ असं आहे. या अपघातात जेनिता गांधीला मानेला आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली होती. 


पुढे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, ही घटना घडल्यानंतर दलीप हे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण गणेश विसर्जनामुळे ते फार काळ पळू शकले नाही ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले. ज्यामुळे त्या ऑटोमध्ये असलेल्या जेनिता आणि गौरव यांनी त्यांना पकडलं. त्यानंतर दलीप कारमधून बाहेर येऊन लोकांना धक्का - मुक्की करू लागले. दलीप यांच वागणं पाहून पोलिसांना बोलवण्यात आलं. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दलीप यांना अटक करण्यात आलं. आता त्यांना जामीनावर सोडण्यात आलं आहे. दलीप यांनी या दरम्यान आपलं रक्त तपासण्या करता मनाई केली.