मुंबई : दाक्षिणात्य कलाजगत गाजवणाऱ्या आणि ते वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे धनुष. अभिनेता रजनीकांत यांचा जावई, अशीही त्याची आणखी एक ओळख. पण, आता मात्र ही ओळख नाहीशीच झाली आहे. कारण रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि धनुष या दोघांनीही त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचं ठरवलं आहे. (Dhanush Aishwarya)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्यात आलेल्या या वळणाची माहिती चाहत्यांना दिली. 


जोडीदार, दोन मुलांचे पालक म्हणून गेली 18 वर्षे एकमेकांची साथ दिली. पण, आता मात्र वेगळं होऊन आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. स्वत:ला समजून घेण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्यांनी सर्वांनाच घटस्फोटाबाबतची माहिती दिली. 


सर्वांसाठी अर्थातच हा एक मोठा धक्का होता. सोशल मीडियावर याबाबतच्या जबरदस्त चर्चाही झाल्या. त्यातच एक व्हिडीओही व्हायरल झाला. 


व्हिडीओमध्ये धनुष आणि ऐश्वर्याचं सुरेख नातं पाहून यांचा घटस्फोट होऊच कसा शकतो, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे. 


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये धनुष एक गाणं गाताना दिसत आहे. गाणं गात तो मोठ्या प्रेमानं ऐश्वर्याच्या जवळ येतो. 


पतीची ही अदा पाहून ऐश्वर्याही तिचा चेहरा लाजेनं लपवत असल्याचं दिसतं. 



तसा धनुष फार मितभाषी आणि जाहीरपणे व्यक्त न होणाऱ्यांपैकी. पण, ऐश्वर्या समोर येताच त्याच्याही काळजाचं त्या क्षणी पाणी झालं हेच या व्हिडीओत दिसत आहे. 


वस्तुस्थिती अशी, ही हा फक्त व्हायरल होणारा व्हिडीओ आहे आणि आता या जोडीसाठी तो त्यांचा भूतकाळ.