मुंबई : चित्रपट, रंगभूमी आणि कलाजगतातील विविध विभागांमध्ये मोलाचं योगदान देणारं एक नाव म्हणजे अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे. कलाकाराचं आयुष्य जगत असताना हा अभिनेता त्याची खरी ओळख मात्र विसरलेला नाही. (Actor director praveen tarde shares farming video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही म्हणाल खरी ओळख ? ती कोणती? तर, प्रवीण तरडे यांची खरी ओळख काय, हे त्यांच्या फेसबुक पेजवरील बायो पाहून लगेचच लक्षात येत आहे. इथं Farmer असं लिहित त्यांनी स्वत:ची खरी ओळख केव्हाचीच जगासमोर आणली. 


कामाचं व्यग्र वेळापत्रक आणि सततचे दौरे या साऱ्यातून वेळ मिळाला आणि ही संधी न दवडता प्रवीण तरडे थेट शेतात उतरले आणि त्यांनी बैल हाताशी घेत गुडघाभर चिखलात शेतीची कामं सुरु केली. 



काळ्या मातीत मातीत... हे गाणं त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहताना कानावर पडतं आणि नकळतच हा अभिनेता मातीशीही जोडला गेला आहे याची अनुभूती होते. 


'हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात.. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू', असं अतिशय समर्पक कॅप्शन देत तरडे यांनी धरणीप्रती आपती कृतज्ञता व्यक्त केली. काय मग, कलाकारात दडलेल्या शेतकऱ्याचा नव्हे तर शेतकऱ्यात दडलेल्या या कलाकाराचा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला?