Amir सारखी बॉडी करायला गेला आणि 10 दिवस दवाखान्यात भरती झाला `हा` अभिनेता
असाच एक अभिनेता आहे ज्यानंही अशीच बॉडी बनवण्याचा प्रयत्न केला.
Fawad Khan on Body Transformation: हल्ली बॉलीवूडमधील मोठंमोठे कलाकार चित्रपटासाठी आपली बॉडी बनवताना दिसतात. त्याचबरोबर इन्टाग्रामवर आपली बॉडी फ्लॉट (Celebrity Fitness) करतानाही दिसतात. बॉलीवूड सेलिब्रेटींची बॉडी पाहून त्यांच्या चाहत्यांनाही तशी बॉडी बनवायची इच्छा होते. फक्त चाहतेच नाही तर आपल्या आवडत्या हिरोची बॉडी पाहून नवोदित हिरोही तशीच बॉडी करण्याचा प्रयत्न करतात.
असाच एक अभिनेता आहे ज्यानंही अशीच बॉडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला चक्क 10 दिवस हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. हा अभिनेता आहे फवाद खान (Fawad Khan). त्याच्या एका चित्रपटासाठी त्याला आमिर खानसारखी बॉडी बनवायची होती तसा त्यानं प्रयत्न केलाही परंतु त्याचा विपरित परिणाम झाला आणि त्याच्या शरीरात विविध बदल होत गेले. (Fawad Khan Body Transformation)
त्याच्या किडनीवरही परिणाम झाला आणि तो इतका झाला की त्याला त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. फवाद खाननं एका मुलाखतीत सांगितलं की त्याला क्रिश्चियन बेल (Kristian Bell) आणि आमिर खान (Amir Khan) याच्यासारखी बॉडी बनवायची होती परंतु असं करणं त्याला महागात पडलं. तेव्हा यानंतर आपण परत असं कधीच करणार नाही असं निश्चयही फवादनं केला. सेलिब्रेटी ज्या प्रकारे चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन (Celebrity Body Transformation) करतात त्याप्रमाणे फवाद खानलाही करायचं होतं.
मुलाखतीदरम्यान फवाद खाननं असंही सांगितलं की असं केल्यामुळे मला 10 दिवस हॉस्पिटलमध्ये एडमिट व्हावं लागलं. त्याचबरोबर आपल्या या चुकीमुळे शरीराचेही हाल झाले आपण असं करायला नको होतं. आपण दुसऱ्याचं कॉपी करू शकतं नाही मग ते काहीही असो, अशी कबूलाही त्यानं दिली.
फवाद खान आगामी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.