दहा दिवसांत `या` अभिनेत्यानं गमावलं आई-वडिलांचं छत्र
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई-वडिलांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा असतो.
मुंबई : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई-वडिलांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र टीव्ही अभिनेता गौरव चोप्राने दहा दिवसांमध्ये आई-वडिलांचं छत्र गमावलं आहे. सध्या गौरववर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. १९ ऑगस्ट रोजी त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर लगेच १० दिवसांमध्ये म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी त्याच्या वडिलांचं निधन झालं. आई-वडिलांच्या निधनामुळे गौरवला मोठा धक्का बसला आहे. याची माहीती खुद्द गौरवने सोशलमीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
वडिलांचा फोटो पोस्ट करत त्याने भावूक कॅप्शन लिहिले आहे, 'श्री स्वातंत्र चोप्रा.. माझे हिरो, माझे आयडॉल, मझी प्रेरणा... मला ही गोष्ट समजण्यास २५ वर्षांचा काळ लागला. सर्व पिता तुमच्या सारखे नसतात. ते माझ्यासाठी खास होते. त्यांचा मुलगा असणं माझ्यासाठी एक वरदान आहे.' असं तो म्हणाला.
पुढे म्हणाला, '१९ ऑगस्टरोजी आई जगाचा निरोप घेतला तर २९ ऑगस्ट रोजी वडिलांचं निधन झालं. आता या आयुष्यात मला ऐकटं असल्यासारखं वाटत आहे. माझं हे ऐकटेपण दुसरं कोणीही भरू शकत नाही.'
शिवाय आईच्या निधनाची बातमी देखील त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. गेल्या तीन वर्षांपासून त्याची आई कर्करोगाशी झुंज देत होती. दरम्यान 'उत्तरायन' 'ऐसा देश है मेरा' या मालिकांच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या गौरवने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
शिवाय 'उतरन', 'साड्डा हक' आणि 'संजीवनी' या मलिकांमध्ये देखील गौरवने मुख्य भूमिका साकारली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने त्याने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे.