मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळ्यांनाच खूप मोठा फटका पडला आहे. अनेक जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टी नरसिम्हा राओ ज्यांना टीएनआर नावाने ओळखले जातात. त्यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, Frankly Speaking With TNR लोकप्रिय असलेले अभिनेता आणि एँकरला हैदराबादमध्ये मलकजगिरी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांची तब्बेत गंभीर असल्याचं म्हटलं गेलं. 


टीएनआर काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. ते या आजारातून देखील बरे झाले होते. काही दिवस बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास जाणवला. त्यानंतर पुन्हा एकदा टीएनआर यांना रूग्णालयात भर्ती करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवू शकले नाही. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. टीएनआर लवकरच अनिल रविपुडी यांच्या सिनेमात दिसणार होते. 


देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढणाऱ्या रुग्ण संख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सर्वत्र केला जात आहे. या दुसर्‍या लाटेमुळे, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईचा सर्वात जास्त कोरोना केसेस असलेल्या शहरांमध्ये समावेश झाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथे संसर्गाची गती नियंत्रित आणली गेली आहे. बीएमसी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या म्हणण्यानुसार मुंबईमधील रिकवरीचे प्रमाण 90 टक्क्यांच्या पुढे गेले आहे, तर मृत्यूचे प्रमाण 0.04 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.


कोरोना साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईतील आरोग्य विभाग, नगरपालिका यांच्यासह सामूहिक प्रयत्नांनी अशी अनेक पावले उचलली गेली आहेत, ज्यामुळे इथल्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.