मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत 'किरण गायकवाड' याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली.


स्मॉल स्क्रिनवरील देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर ही यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करत होते. आता या मालिकेचं दुसरं सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.


या मालिकेत डॉ. अजित कुमारची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड मात्र या मालिकेत दिसणार नसल्याच्या अनेक अफवा येत होत्या. सोशल मीडियावर देखील अनेकांनी किरण ही भूमिका आता करणार नसल्याचं सांगितलं. पण या सर्व बातम्या खोट्या असून सर्वांचा लाडका अभिनेता किरण गायकवाडचं ही भूमिका पुढे सुरु ठेवणार आहे. 



तसेच या मालिकेतील बज्याची भूमिका साकारणारा अभिनेता किरण डांगे देखील नव्या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. कारण ही मालिका पुन्हा एकदा तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.



लवकरच संपुर्ण टीम घराघरात पोहोचून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.