तेलुगु अभिनेता मोहन बाबू चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे त्यांच्या घरी झालेली चोरी. ही चोरी चक्क घरातील विश्वासू नोकराने केलं आहे. या प्रकरणात नोकराला अटक करण्यात आलं आहे. 26 सप्टेंबर रोजी याबाबत माहिती मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचे पीए 22 सप्टेंबर रोजी घरी आले तेव्हा नोकराने बॅग ठेवलेले पैसे चोरल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मोहन बाबू यांच्या पीएच्या ज्या बॅगेतून पैसे चोरीला गेले त्याबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. यानंतर लक्षात आलं की, या बॅगेतून तब्बल 10 लाख रुपयांची चोरी झाली आहे. पोलिसांमध्ये 26 डिसेंबर रोजी याची तक्रार नोंदवण्यात आली. ही तक्रार पहाडीशरीफ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , नोकराला तिरुपतीमध्ये पकडण्यात आलं. हैद्राबादमधून त्याला 25 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलं. 


मोहन बाबूच्या नोकराला अटक


मोहन बाबूच्या आरोपी नोकराकडून पोलिसांनी 7.36 लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित रक्कम आरोपींनी आधीच खर्च केली होती. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अभिनेत्याच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही.


पोलीस कोठडीत आरोपी


अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि आरोपी व्यक्ती रात्री उशिरा त्याच्या घरातून बाहेर पडत होता आणि संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पथके तयार केली. काही वेळातच त्यांनी तिरुपती येथे जाऊन फिर्यादी गणेश नाईक याला ताब्यात घेतले. गुन्हेगाराला रिमांडवर घेण्यात आले आणि बीएनएस (भारतीय न्यायिक संहिता) च्या कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तानुसार, पोलिसांनी त्याच्याकडून 7.3 लाख रुपये रोख आणि एक मोबाईल फोनही जप्त केला आहे.


मोहन बाबूचा आगामी चित्रपट


अभिनेता मोहन बाबू शेवटचा 2023 मध्ये आलेल्या 'शकुंतलम' चित्रपटात सामंथासोबत दिसला होता. त्यांनी दुर्वासा महर्षींची भूमिका साकारली होती. अभिनेता पुढे 'कन्नप्पा' या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा विष्णू मंचू मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.