एका नाटकाचे नानांना ५० रुपये मिळायचे, तेव्हा बॉलीवूडच्या नायिकेला नानांचा अभिनय आवडला...सर्वच बदललं
नाना पाटेकर जेवढे अभिनयामुळे चर्चेत आहेत. तेवढेच ते त्याच्या भांडणांमुळे देखील चर्चेत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे सुरुवातीचे दिवस मोठ्या संघर्षांत गेले आहेत. जेव्हा ते लहान होते, शाळेत गेल्यानंतर त्यांना त्यांच्या शाळेपासून 8 किमी अंतरावर असलेल्या मुंबईतील चुनाभट्टी येथे कामाला देखील जावं लागायचं. कुटुंबात ७ भावंड होती त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाट्यसृष्टीत पदार्पण
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नाना पाटेकर थिएटर आर्टीस्ट होते. प्रत्येक शोमध्ये त्यांना 50 रुपये मिळायचे. एकदा त्यांचं एक नाटक प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील पाहायला आल्या. स्मिता पाटील नानांच्या अभिनयावर खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी नानांना बॉलिवूडमध्ये अभिनय करायला सांगितला ज्यानंतर नानांनी चित्रपटात एंट्री घेतली. नंतर दोघांनीही चित्रपटात एकत्र काम केल.
नाना पाटेकर जेवढे अभिनयामुळे चर्चेत आहेत. तेवढेच ते त्याच्या भांडणांमुळे देखील चर्चेत आहेत. नानांबद्दल असं म्हटलं जातं की, नानांनी ज्यांच्यासोबत काम केलं आहे. त्या दिग्दर्शकाशी ते भांडले आहेत. म्हणूनच जेव्हा नाना चित्रपट साईन केल्यावर करार करता,त तेव्हा त्या करारामध्ये एकदा तरी भांडणाच्या अटीचा उल्लेख करतात.
गावात राहायला आवडतं
नानांचा मूड देसी स्टाईलचा आहे. जो त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसतो. त्यांना मुंबईचं हवामान क्वचितच आवडतं. त्यांना आपल्या गावात पुणे किंवा गोव्यात राहायला आवडतं. नानांची गोव्यातील लोकांमध्ये खूप चर्चा आहे. लोकांना त्यांची स्टाईल खूप आवडते.
रेप सीनवर टाळ्या वाजवल्यानंतर सोडला होता शो
नाना खूप तत्वनिष्ठ आहेत. त्यांना तीच गोष्ट आवडते जी योग्य आणि न्याय्यप्रिय आहे. त्यांना खोटं बोलणं आणि ढोंग करणं आवडत नाही. एकदा त्यांच्या एका कार्यक्रमात काही प्रेक्षकांनी बलात्काराच्या घटनेवर टाळ्यांचा कडकडाट केला. यामुळे नानांना राग अनावर झाला आणि ते हा कार्यक्रम सोडून गेले. नाना म्हणाले की बलात्कार ही एक सामाजिक दुष्कर्म आहे, टाळ्या वाजवणं योग्य नाही.
भारतीय सैन्या सोबत घेतलं प्रशिक्षण
'प्रहार' चित्रपटाच्या वेळी नानांनी आर्मीचं प्रशिक्षण घेतलं. यासाठी ते तीन महिने भारतीय सैन्यात राहिले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक केलं गेलं. सैन्याने त्यांना अधिकारीपदाचा मानही दिला.
मित्राच्या मदतीसाठी गहाण ठेवलं होतं घर
मैत्रीच्या बाबतीत नानांचं मन मोठं आहे. आपला मित्र दिग्दर्शक एन चंद्र यांना मदत करण्यासाठी त्यांनी त्यांचं घर गहाण ठेवलं. नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर एन चंद्रा यांनी त्यांना दिलेली रक्कम परत केली आणि भेटवस्तू म्हणून स्कूटरही दिली.